दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

अवयदानासाठी जळगावहून औरंगाबादेत, दिवाळीच्या दिवशी तिघांच्या आयुष्यात नवा 'प्रकाश,
दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

फेकरी Fekari ता. भुसावळ

ड्रेसची ओढणी (Pulling the dress) दुचाकीच्या मागच्या ( bike) चाकात अडकून झालेल्या अपघातात (accident) दूचाकीवरील महिलेच्या (woman) गळ्याला फास बसल्याने मानेसह नसांना ( injury noose around the neck) दुखापत झाली. यात सदर महिलेचा ब्रेन डेड (Brain dead) झाला. तीच्या पतीने पत्नीचे (Husband to wife) अवयव दान (organ donation) करून तीघांच्या आयुष्यात प्रकाश आणला आहे.

दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्रातील सेवानिवृत्त कर्मचारी व्हि.डी.भगत कुटुंबांसह भुसावळ येथे स्थायीक झाले. त्यांचा मोठा मुलगा राजेश भगत हाउसिंग फायनान्स मध्ये कामाला असून काही दिवसांपूर्वी ते व त्यांची पत्नी सिमा, मुल जळगाव येथे  स्थायिक झाले. राजेश भगत सह  सिमा भगत व त्यांची चार वर्षाची मुलगी  दिवाळीच्या खरेदीसाठी दुचाकीवरून बाजारात जातांना सिमा भगत यांची ड्रेसची ओढणी दूचाकीच्या चाकात अडकून अपघात घडला. सुदैवाने राजेश भगत व त्यांची चार वर्षाची मुलगी यांना किरकोळ जखमा होऊन ते सुखरूप वाचले. पण ओढणीमुळे सिमा यांच्या गळ्याभोवती फास बसल्याने मानेला आणि नसांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर जळगावत येथे उपचार सुरू असतांना त्या ब्रेनडेड असल्याची लक्षणे डॉक्टरांनी वर्तवली.

जळगाव मध्ये अवयवदानाची सुविधा नसल्याने त्यांना २२ ऑक्टोबर रोजी रात्री औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती सिमा यांना ब्रेनडेड  घोषित करण्यात आले.

कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल, या भावनेने पती राजेश विश्वनाथ भगत व त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाला होकार दिला. एमजीएम रुग्णालयाचे उपअधिष्ठाता आणि शल्यचिकित्सक डॉ.प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी अवयवदानाची प्रक्रिया करण्यात आली.

डॉ.सूर्यवंशी यांच्यासह डॉ. मयुरी पोरे, डॉ.प्रशांत अकुलवार, डॉ.योगेश अडकिने, डॉ.जिब्रान अहेमद, डॉ.वासंती केळकर, डॉ.निनाद देशमुख, प्रत्यारोपण समन्वयक फरान हाश्मी, युथ सोशल वेलफेअर फाउंडेशनचे राजेशसिंह सूर्यवंशी यांनी यासाठी प्रयत्न केले.

सिमा भगत यांच्या पश्चात पती, बारा वर्षाचा मुलगा, चार वर्षाची मुलगी, सासु-सासरे, देर-देरानी, ननद-नंदौई,आई-वडील, दोन भाऊ असा परिवार असून सिमा यांच्या अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रसंगी भगत कुटूंबींयानी अवयवदानाचा निर्णय घेऊन तीन रुग्णांना जीवनदान दिल्याने परिसरातून त्यांच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.

दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड
ना.अंबादास दानवे यांचा आरोप : शिंदे सरकार शेतकरी विरोधी

  अवयवदानासंदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. जवळपास १०० न्यूरोसर्जन्सना रिपोर्ट पाठविले. अखेर अवयदानाचा निर्णय घेतल्याचे महिलाच्या पतीने यावेळी सांगितले. मराठवाड्यातील हे २८ वे अवयवदान ठरले आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा अवयवदानाच्या चळवळीला  वेग मिळाला आहे. त्यामुळे मूत्रपिंड, यकृताच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

 हृदयदान टळले, दोन मूत्रपिंड, यकृतांचे प्रत्यारोपण

एका मूत्रपिंडाचे एमजीएम रुग्णालयातच ३० वर्षाच्या महिलेवर आणि दुसऱ्या मूत्रपिंडाचे युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये ३७ वर्षाच्या महिलेवर प्रत्यारोपण करण्यात आले. यकृत पुणे येथील रुग्णालयात दाखल ४२ वर्षाच्या पुरुष रुग्णावर प्रत्यारोपित करण्यासाठी पाठविण्यात आले. अपघात झाल्यानंतर महिलेचे हृदय 'सीपीआर' देऊन कार्यान्वित करण्यात आले होते. त्यामुळे ह्रदयदान टळले.

दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड
तुरीच्या शेतात 62 लाखाच्या गांजाची लागवड

सिमा यांच्या अवयवदानामुळे कोणाला तरी नवीन आयुष्य मिळेल. दुचाकी वर बसताना महिलांनी ओढणी सांभाळली पाहिजे, अशी वेळ पुन्हा कोणावर येऊ नये अशी भावना ब्रेनडेड महिलेचे पती राजेश भगत यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना व्यक्त केली. 

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com