वन्यजीवांचे अवशेषासह वनस्पतींची विक्री करणार्‍या महिलेस अटक

सुभाष चौकात वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोच्या पथकाची कारवाई ः एक दिवसाची पोलीस कोठडी
वन्यजीवांचे अवशेषासह वनस्पतींची विक्री करणार्‍या महिलेस अटक

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

शहरातील सुभाष चौकात वन्यजीवांचे अवशेष (Remains of wildlife) व वनस्पतींची बेकायदेशीरपणे (Illegal sale of plants)विक्री करणार्‍या एका महिलेस (Women) शुक्रवारी वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोच्या (Wildlife Crime Control Bureau squad) पथकाने अटक (arrested) केली. अंधश्रद्धेपोटी काळीजादू करण्यासाठी या साहित्यांचा वापर केला जातो. तर आजारांना बरे करण्याच्या नावाने वनस्पतींची बेकायदेशीर विक्री करीत असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

जळगावातील सुभाष चौकात एक महिला वन्यजीवांचे अवशेष व वनस्पतींची बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने शुक्रवारी सुभाष चौकात कारवाई केली. यावेळी तेथे एक महिला काळा प्रवाळ, हातजोडी, शाहुदी कांता या वनस्पती तसेच मांजरीचे नखे, सायडचे काटे विक्री करताना आढळुन आली.

पथकाने या महिलेस ताब्यात घेऊन सर्व साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी महिलेविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी महिलेस न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने महिलेस एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com