ग.स.निवडणुकीसाठी 18 एप्रिलपर्यंत माघारीची मुदत

दोन दिवसात एकही उमेदवाराची माघार नाही; मनधरणीवर भर
ग.स.निवडणुकीसाठी 18 एप्रिलपर्यंत माघारीची मुदत

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

ग.स.सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या (Co-operative Credit Bureau of District Government Servants) 21 जागांसाठी छाननीअंती सोमवारी उमेदवारांची यादी प्रसिद्ध (List of candidates published) करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने (not withdrawn) बाहेरील मतदार संघासह विविध मतदार संघात आता 169 उमेदवार रिंगणात आहे. 18 एप्रिलपर्यंत माघारीची (withdrawn) अंतीम मुदत असल्याने उमेवारांची मन धरणी करण्यासाठी फिल्डींग लावली जात आहे.

ग.स.सोसायटीच्या निवडणुकीची (election) रणधुमाळीला दि.25 मार्चपासून प्रारंभ झाला असून 31 मार्च रोजी अखेरच्या दिवशी 278 उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. दि.1 एप्रिल रोजी झालेल्या अर्ज छाननीत (Application scrutiny) सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. मात्र, उमेदवारांचे एकापेक्षा जास्त अर्ज असल्याने ते कमी करुन त्यांचा एकच अर्ज ठेवण्यात आला आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि.4 ते 18 एप्रिलदरम्यान माघारीसाठी मुदत (Deadline for withdrawal) दिली आहे.

दोन दिवसात एकाही उमेदवाराने माघार घेतली नसल्याने आता बाहेरील मतदार संघात 81 उमेदवारांचे अर्ज रिंगणात आहे. अनु.जाती,जमाती मतदार संघात 6 तर विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात 15, महिला राखीवमध्ये 15 तर इतर मागास वर्ग-14 तर स्थानिक मतदार संघात 38 उमेदवारांचे अर्ज रिंगणात आहे.

असे एकूण 169 उमेदवार (Candidate) रिंगणात आहे. सहकार, लोकसहकार, लोकमान्य,प्रगती शिक्षक सेना, सुराज्य पॅन आदी प्रमुख पॅनल दंड थोपटून मैदानात उतरले आहे.आता माघारीसाठी 13 दिवस उरले असून प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून माघारीसाठी मनधरणी करण्याच्या हालचाली गतीमान झाल्या आहे.

प्रगती शिक्षक सेना गटाचे (Pragati Shikshak Sena group) रावसाहेब पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी संतोष बिडवई (Returning Officer Santosh Bidwai) यांच्याकडे दाखल तक्रारीवरुन दोन अर्ज अपात्र झाले आहे. तर सहकार गटाचे अध्यक्ष उदय पाटील, लोकमान्य गटाचे विलास नेरकर, लोकसहकार गटाचे सुनील सूर्यवंशी यांच्यासह 13 उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. या निवडणुकीच्या रिंगणात 169 उमेदवार असून दि. 18 एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून माघारीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहे.

Related Stories

No stories found.