
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
तालुक्यातील सर्वात मोठी शिक्षण संस्था (Educational institutions) असलेल्या राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाची सध्या रणधुमाळी सुरू आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आज ८८ जणांनी माघार घेतले असून आता संस्थेच्या १९ जागांसाठी सुमारे ५१ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी लॉबींग करुन अनेकांना अर्ज माघे घेण्यास भाग पाडल्याचे सांगण्यात येत आहे.
आता दोन पॅनलमध्ये ही लढत असून काटेकी टक्कर होणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत. यात सर्वसाधरण ३७, महिला राखीव ०६, इतर मागास वर्ग ०३, अनु.जाती / जमाती ०३, वि.जा/ विमाप्र ०२ असे एकूण ५१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता हे सर्व उमेदवार पायाला भिगरी लावून फिरणार आहे, मतदार देखील लक्ष्मीदर्शनाची वाट पाहत असल्याची चर्चा तालुक्यात आहे. दि, ८ जानेवारी २०२३ रोजी मतदान होणार असून दि,९ रोजी मतमोजणी होणार आहे.