भ्रष्टाचाराबाबतची तक्रार मागे घे अन्यथा तुझा मर्डरच करतो

जिल्हा परिषद कनिष्ठ अभियंत्यांची कॉंग्रेसच्या माजी तालुकाध्यक्षांना धमकी
भ्रष्टाचाराबाबतची तक्रार मागे घे अन्यथा तुझा मर्डरच करतो
crime news

जळगाव - Jalgaon

जिल्हा परिषदेचे कनिष्ठ अभियंता मयुर कोकाटे यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या विरोधात पंचायत राज समितीसमोर भष्ट्राचाराबाबतची दिलेली तक्रार मागे घे अन्यथा तुझा मर्डर अशी कॉग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष संजय वराडे यांना धमकी दिल्याची समोर आली आहे. याप्रकरणी वराडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मंगळवारी रोजी एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.

संजय वराडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार असे की, ते जळगाव शहरातील अयोध्यानगरात वास्तव्यास आहेत. वराडे यांनी दि. २७ सप्टेंबर २०२१ रोजी सिंचन विभागातील भ्रष्टाचाराबाबत जिल्हा परिषदेतील अधिकारी जितेंद्र विसपुते यांच्या विरोधात पंचायत राज कमिटीमध्ये अध्यक्ष यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार केल्या आहेत. विसपुते यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी कनिष्ठ अभियंता मयुर कोकाटे यांनी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संजय वराडे यांना मोबाईलवर फोन केला.

तक्रार मागे, तक्रार मागे घेतली नाही तर तुझा मर्डर करुन टाकू, आमदार, खासदार असो आम्ही घाबरत नाही अशी धमकी वराडे यांना कोकाटे यांनी दिली. अशा आशयाच्या तक्रारीवरुन कनिष्ठ अभियंता मयुर कोकाटे रा. भुसावळ यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वराडे यांनी याबाबत नाशिक विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनाही निवेदन दिले असून संबंधित अधिकार्‍यांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत व त्यांना पदावरुन कायमस्वरुपी मुक्त करावे अशी मागणी निवेदनाव्दारे केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com