
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
वडीलोपार्जीत जागा खाली करण्यास (lower the space) सांगितल्याने वकीलाच्या घरासमोर (front of the lawyer's house) अमावस्या व पौर्णिमेच्या दिवशी (new moon and full moon) मानवी केस व हळद कुंकू वाहिलेली काळी बाहुलीला सुया टोचून (Needles pierced the black doll) त्यांना जादू टोणा (Magic)करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शिवाजी नगरातील दाळफळ परिसरात अॅड. केदार भुसारी हे वास्तव्यास आहे. त्यांच्या वडीलोपार्जीत जागेवर प्रकाश रामेश्वर व्यास त्यांची पत्नी ललिता प्रकाश व्यास, सुशिला गोपाळ पंडीत, विद्या गोपाळ पुरोहीत, गौरीलाल रुपचंद पुरोहीत हे 40 ते 45 वर्षांपासून राहत होते. या जागेचा निकाल न्यायालयाने सन 2017 मध्ये भुसारी यांच्या बाजून दिला होता.
तेव्हापासून संबंधित लोक त्यांच्याविरुद्ध वैर भावनेने वागत होते. दि. 30 मे रोजी अमावस्येच्या दिवशी दुपारच्या सुमारास अॅड. भुसारी यांच्या घराच्या गेटवर मानवी केस हळद कुंकू टाकलेले दिसून आले. त्याच दिवशी रात्री लाईट गेल्याने कोणीतरी त्यांच्या घरावर दगड मारले.
काही दिवसानंतर दि. 14 जून रोजी पोर्णिमेला सकाळी 6 वाजता घराबाहेर वाळत घातलेल्या कपड्यांवर रक्त टाकल्याचे अॅड. भुसारी यांच्या पत्नीला दिसले. त्यामुळे त्या प्रचंड घाबरुन गेल्या होत्या. मंगळवारी दि. 28 जून रोजी दुपारी भुसारी यांच्या पत्नी त्यांना डबा देण्यासाठी घराबाहेर पडल्या असता, त्यांच्या घराच्या गेटसमोर कणकेचा गोळा आणि त्यावर काळी बाहुली हळद व कुंकू वाहिलेली दिसली. त्यावर पिवळ्या रंगानी फुली करुन ठिकठिकाणी सुया टोचलेल्या होत्या.
जादूटोणांतर्गत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
हा प्रकार पाहून अॅड. भुसारी यांच्या पत्नी प्रचंड घाबरुन गेल्या होत्या. त्यांनी तात्काळ हा प्रकार त्यांचे पती अॅड. भुसारी यांना सांगितला. त्यांनी तात्काळ शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अंजली केदार भुसारी यांच्या तक्रारीवरुन प्रकाश रामेश्वर व्यास, ललिता प्रकाश व्यास, सुशिल गोपाळ पंडीत, विद्या गोपाळ पुरोहीत, गौरीलाल रुपचंद पुरोहीत यंच्याविरुद्ध जादूटोणा कायद्यांतर्गत पोना ललित भदाणे यांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी हे करीत आहे.