5 टक्के जीएसटी रद्दसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

खा. उन्मेश पाटील यांची महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला ग्वाही
 5 टक्के जीएसटी रद्दसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

महाराष्ट्र चेंबर (Maharashtra Chamber) व व्यापारी संघटनांतर्फे (Trade Associations) विरोध (opposition) असलेल्या 5 टक्के जीएसटी (5 percent GST) कराबाबत आपल्या भावना केंद्र सरकारकडे (central government) पोहचवीण्याठी मी व्यक्तिशः प्रयत्नशील असून येत्या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman)यांच्याकडे अन्नधान्य व कडधान्यावरील (cereals and pulses) 5 टक्के जीएसटी कर रद्द (cancellation) बाबत पाठपुरावा करणार अशी ग्वाही खा. उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाला दिली.

महाराष्ट्र चेंबरच्या जळगाव शाखा कार्यालयात खा. उन्मेश पाटील यांनी भेट देऊन पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी केंद्र सरकारने अन्नधान्य व कडधान्यावर पाच टक्के जीएसटी कर लागू केला आहे त्यास महाराष्ट्र चेंबर व व्यापारी संघटनांतर्फे विरोध केला असून आमच्या भावना केंद्र सरकारकडे पोहचवाव्यात अशी मागणी चेंबरच्या कार्यकारणी सदस्य संगीता पाटील, दिलीप गांधी, नितीन इंगळे यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांचेकडे मांडली.

यावेळी दाणा बाजार असोशीएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया, दालमिल असोचे. सेक्रेटरी रमेशचंद्र जाजू, सराफ बाजार असोचे. सेक्रेटरी स्वरूप लुंकड महाराष्ट्र यांनी अन्नधान्यावरील पाच टक्के जीएसटी मुळे होणार्‍या परिणामांची माहिती दिली व व्यापारी सामान्य नागरिक व शेतकरी यांना या पाच टक्के जीएसटी मुळे मोठा त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली.

त्यानंतर पदाधिकार्‍यांनी खा.पाटील यांना निवेदन दिले.याप्रसंगी भाजपा महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जैन युवा फाउंडेशनचे उपाध्यक्ष प्रणव मेहता तसेच व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जीएसटीला महाराष्ट्र चेंबरचा विरोध

महाराष्ट्र चेंबर अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय बैठक पार पडली. अन्नधान्यावरील 5 टक्के जीएसटी तरतुदीला तीव्र विरोध करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com