सप्ताह घडामोडी : हीच का तुमची पोलिसिंग?

 सप्ताह घडामोडी : हीच का तुमची पोलिसिंग?

घरातील कर्ता पुरुष गेल्याने मदत मागण्या साठी आलेल्या कुटुंबावर जिल्हा दूध संघात पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. एकीकडे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याचे कारण दाखवित लाठीचार्ज केल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. मात्र दुसरीकडे जिल्ह्यात चोरट्यांसह, दरोडेखोर व सराईत गुन्हेगारांवर पोलिसांना हुडकावून लावित असल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे हीच का पोलिसांची पोलीसींग? असा सवाल आता सर्व सामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होवू लागला आहे.

दोन दिवसांपुर्वी मुक्ताईनगर जवळ झालेल्य अपघातात दूध संघातील कर्मचार्‍याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मयताच्या कुटुंबियाची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने कुटुंबियांना आर्थीक मदत मिळावी म्हणून कुटुंबियांसह दूध संघातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी थेट शवविच्छेदन झालेला मृतदेह सोबत आणीत दूध संघात ठिय्या मांडला होता. मृतदेह घेवून येणारी रुग्णवाहिका पोलिसांकडून प्रवेशद्वारावरच अडवून ठेवण्यात आली. या आंदोलनात मयताची पत्नी पाच महिन्यांची गर्भवती असतांना तीन आपल्या दोन चिमुकल्या मुलींसोबत आपल्या पती गेल्याचे दु:ख आपल्या काळजात ठेवून आंदोलनात सहभागी झाली होती.

चार ते पाच तासांचा कालावधी उलटून देखील दूध संघाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने पोलिसांची मध्यस्तीची भूमिका निभावली. मात्र आपल्या हातात काहीच नसल्याचे सांगत दूध संघाच्या कार्यकारी संचालकांनी हातवर केले. त्यामुळे सोनार कुटुंबीय हताश होवून मृतदेह घरी घेवून जाण्याच्या तयारीत होते.

दिवसभराचा कालावधी उलटून देखील दूध संघाकडून दमडीचीही मदत न मिळाल्याने संतप्त कर्मचार्‍यांनी मृतदेह थेट दूध संघाच्या आवारात ठेवत आंदोलन करीत होते. मात्र पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचे कारण पुढे करीत आक्रमक होवून मयताच्या कुटुंबियांवर लाठीचार्ज केला.

आधीच शोक मग्न असलेल्या कुटूंबाच्या दु:खावर सांत्वनाची फुंकर मारण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज करणे हे माणुसकीच्यादृष्टीने क्लेशदायक आहे. एकीकडे पोलीस अधीक्षक अनेक सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पोलीस व नागरिकांमधली दरी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे.

अन् दुसरीकडे पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेवरच पोलिसींग करीत आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांचा उद्देश कितपत सफल होईल हे नक्की सांगता येणार नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com