जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी का बरं दिला असेल इशारा - गिरणा जिवंत राहिली तरच...

जलपुरुष राजेंद्र सिंह यांनी का बरं दिला असेल इशारा - गिरणा जिवंत राहिली तरच...

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अवैध वाळूचोरीसह (Invalid sand) विविध कारणांमुळे जिल्ह्याचे वैभव असलेली गिरणा नदी (Girna river) मरणासन्न अवस्थेत (verge of death) आलेली आहे. गिरणा नदी जीवंत राहिली (Girna is alive) तर आपली पुढची पिढी (next generation) जगेल. गिरणा नदीला जीवंत ठेवण्यासाठी सर्वांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच गिरणा नदी पुनरुज्जीवन अभियान (Revival campaign) यशस्वी होईल असा आशावाद रॅमेन मॅगसेसे पुरस्कार विजेते तथा जलपुरूष राजेंद्र सिंह (Ramen Magsaysay Award winner and aquatic man Rajendra sinh) यांनी व्यक्त केला.

राजेंद्र सिंह ही गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत शनिवारी जळगाव जिल्ह्यात आले होते. यादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात पर्यावरण प्रेमींसह लोकप्रतिनिधींसोबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी राजेंद्रसिंह बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बांबू मॅन पाशा पटेल, खासदार उन्मेश पाटील, आमदार सुरेश भोळे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, महानगराध्यक्ष दिपक सुर्यवंशी,सहाय्यक आयकर आयुक्त डॉ. उज्वल कुमार चव्हाण यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

प्रास्ताविकात खासदार उन्मेश पाटील यांनी गिरणा पुनरुज्जीवन अभियानाचे उद्देश, त्याचे स्वरुप स्पष्ट केले. हा कार्यक्रम कुठलाही पक्ष अथवा गटाचा नाही. या कार्यक्रमाला गटातटाची तसेच राजकीय किनार न लागला. हे अभियान यशस्वीरित्या पार पडले असा विश्वास खा. उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला.

सावध एैका पुढच्या हाका

जगात केपटाऊन हे पाणी नसलेले शहर म्हणून जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी भविष्यात काळजी घेतली नाही. तर केपटाऊनप्रमाणे जळगाव जिल्हा सुध्दा पाणी नसलेले जिल्हा म्हणून जाहीर होवू शकतो. भविष्यात पर्यावरणीय समस्यावर सर्वांनी एकत्रित मार्ग काढावेत, असे यावेळी बांबू मॅन पाशा पटेल म्हणाले. एकटा राजेंद्रसिंह हे काय चमत्कार करुन शकता. हे जगासमोर आले आहे. त्यामुळे जळगावच नाही तर राज्याला पाणीदार बनविण्याची ताकद आपण सर्वांमध्ये आहे. 2030 मधील विदारक चित्र कसे असेल, यावरही पाशा पटेल यांनी भाष्य केले. पेट्रोल डिझेलवर पर्याय म्हणून इथेनॉलबाबत अभ्यास सुरु आहे. अभ्यासात ते निष्पन्नही झाले. आणि जास्तीत जास्त इथेनॉल मिळविण्यासाठी बांबूचे महत्वही यावेळी पाशा पटेल यांनी स्पष्ट केले.

मान्यवरांच्या हस्ते संस्था व्यक्तींचा सत्कार

या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते पाणी, पक्षी, प्राणी यासह पर्यावरण क्षेत्रात, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या व्यक्ती संस्थांचा सत्कार करण्यात आला. यात चाळीसगाव तालुक्यातील पाणी जिरवण्याचा संकल्प करुन ते यशस्वीरित्या राबविणार्‍या मिशन 500 कोटीचे शेखर निंबाळकर, सहाय्यक आयुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण, सर्पमित्र राजेंश ठोंबरे, वन्यजीव सरंक्षण संस्था, अँग्रोवन, गिरणा प्रेमी गृप भडगाव पाचोरा, भरारी फांऊडेशनचे दीपक परदेशी, एरंडोल येथील मैत्रीसेवा फांडेशन, योगी फाउंडेशन, वृक्षसंवर्धन समितीचे चंद्रशेखर नेवे, मराठी प्रतिष्ठानचे अ‍ॅड. जमील देशपांडे, डॉ प्रताप जाधव, पिलखोड येथील गिरणा जल फांऊडेशन, अग्निपंख फांडेशनचे इमरान तडवी व टीम यांचा शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेले स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला.

कानळदा येथून ‘गिरणा परिक्रमेला’ सुरुवात

गिरणा नदीच्या संवर्धनासह नदीपात्रातील बेसुमार अनधिकृत वाळू उपसासह अतिक्रमणाच्या प्रश्नांसह जनजागृतीसाठी शनिवारी जळगाव तालुक्यातील कानळदा येथुन रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्र सिंह, बांबु मॅन माजी आमदार पाशा पटेल यांच्या उपस्थित गिरणा नदी परिक्रमेला सुरुवात झाली.

कानळदा येथे गिरणा नदीचे पूजन करुन गिरणा परिक्रमेला सुरुवात झाली. खासदार उन्मेश पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील , जि प उपाध्यक्ष लालचंद पाटील , भाजप जिल्हा अध्यक्ष आ. सुरेश भोळे, माजी आमदार स्मिता वाघ, नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे , महानगराध्यक्ष दिपक सुर्यंवंशी, गिरणा बचाव समिती सदस्य हर्षल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तिरंगा ध्वज घेऊन

14 किमी पायी प्रवास

यावेळी गिरणा नदी के बचाव मे हम सब मैदान मे याप्रमाणे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गिरणा नदीच्या संवर्धनासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तिरंगा ध्वज घेऊन खासदार उन्मेश पाटील यांनी मान्यवरांसह गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये 14 किलोमिटर पायी प्रवास केला. जळगाव जिल्ह्यात गिरणा नदीकाठच्या गावांमध्ये खासदार उन्मेश पाटील हे जनजागृती करीत पायी चालत प्रवास करणार आहे. महिनाभरानंतर या परिक्रमेचा समारोप होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com