भाद्रपद मासातील पितृपक्ष पंधरवाड्यात कावळा पक्षाला एवढे महत्व का?

कावळे पर्यावरणाचा मोठा घटकातील दूत व रक्षक
भाद्रपद मासातील पितृपक्ष पंधरवाड्यात कावळा पक्षाला एवढे महत्व का?

गुढे, ता.भडगाव (वार्ताहर) -

अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जनानंतर महालयारंभ प्रतिप्रदा श्राद्ध पोर्णिमापासून भाद्रपद कृष्ण पक्षाला प्रारंभ होतो याच दिवसापासून पितृपक्ष पंधरवाडा(श्राद्धकाळ) सुरुवात होते. या काळात आपल्या घरातील दिवंगत झालेल्या व्यक्तीचा मृत्यू काळातील तिथीनुसार वर्षातून एकदा पितृ पक्षात श्राद्ध घालण्याची जेवू घालण्याची पूर्वापार जुनी रूढी पंरपरा आजही आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञानाच्या काळात देखील जोपासली जात आहे

.या श्राद्ध काळात कावळा पक्षालाच का?एवढे महत्व काय आहे.इतर पक्षाला का नाही ?त्याच पक्षालाच का खाऊ घातले जाते हा विषय पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे या मागे काही धार्मिक,शास्त्रीय कारण देखील आहे. पर्यावरण व कावळा पक्षी यांचा काही महत्वपूर्ण संबंध आहे. ही उत्सुकता या पितृपक्षात सर्वाच लागली असते ती जाणून घ्यायची असते.श्राध्द केले की, कावळ्यालाच का खाऊ घातले जाते हा मोठा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.
जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते.

पण केवळ "वड" व "पिंपळ" हे दोनच महावृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने सर्व मानवांसाठी व जीवांसाठी प्राणवायु(आँक्सीजन) उत्सर्जन करतात.हे सर्व जगातील शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लावू शकतो परंतु फक्त "वड" व "पिंपळ" या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती होत नाही.या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा फक्त कावळे खातात इतर कोणताही पक्षी खात नाही तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे विष्ठा करतात,टाकतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष उगवतात व येतात.

या कावळ्यां शिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे फक्त "भाद्रपद" महिन्यातच याच पितृ पक्षातील(श्राद्ध काळात) पंधरवड्यात होते.त्यामुळे त्यांना घराघरातून पोषक आहार या श्राद्ध काळात "प्रत्येक सु-संस्कारी" मानवांनीच दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या आपल्याच संतांनी,शास्त्रकारांनी जाणले होते.आपल्या संस्कृतीतील "ऋषि-मुनि" हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते.माणसांच्या आरोग्यासाठी ही दोनच झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक,महत्वपूर्ण आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन जतन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरु करण्यात आली.ती आजही अखंडपणे श्रध्देपोटी ती आजतागायत सुरु आहे.

ती पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे! फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं "पितृपक्ष"(ग्रामीण भाषेत पितरपाटा)आला की कावळ्यावर टुकार ,जोग व विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच आपण धन्यता मानतो..प्रत्येक प्रथेमागे जे विज्ञान आहे ते शोधण्याऐवजी त्यावर खिल्ली उडवणे यातच पुरोगामीपणा व अति-सुशिक्षितपणा ज्यांना वाटतो त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते,आणि अशा बालिश बुद्धिच्या लोकांकडे लक्ष न दिलेले बरे
नाही तरी कोरोनाने "आँक्सीजन" बद्दलचे महत्त्व समाजाला पटवून चांगलेच समजून दिलेच आहे.

जर का कावळ्यांना घरा घरातून "पितरांच्या" नावाने खायला नाही मिळाले तर आपल्या मागील आपल्या वंशाचे नातू आणि पणतूंचे काय हाल होतील याची कल्पना करा?कधीच व कुठेही, कोणतेही सरकार "आँक्सीजनची"पूर्व तयारी करा हे सांगणार नाही. हेच "वैज्ञानिक" स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा.....
नाहीतर वेळ येईल तेंव्हा पाहू.आज आम्ही हजारो रूपये देऊन रांगेमध्ये दिवस-दिवस उभे राहून आँक्सीजन सिलेंडर मिळविलेच.पण भविष्यात नातू-पणतु लांखो रूपये देतील? की करोंडो देतील? हे ती वेळच ठरवेल म्हणून आजच विचार करून ज्या काही जुन्या रूढी परंपरा चालू आहेत त्यामागे मोठे कारण दडलेले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com