रावेर बाजार समितीवर सत्ता कुणाची ?

रावेर कृषी बाजार समिती
रावेर कृषी बाजार समिती

रावेर raver प्रतिनिधी

येथिल बाजार समितीं निवडणुकीच्या (Election of Market Committees) निमित्ताने तालुक्यातील राजकारण ढवळून (stirring up politics) निघाले आहे.यंदाची बाजार समिती निवडणूक ७ वर्षानंतर होत असून,या निवडणुकीत शेतकरी (farmer) देखील उमेदवारी करू शकल्याने,मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले.त्याचा परिपाक प्रचंड चुरस (Huge square) या निवडणुकीत पाहायला मिळाली.

रावेर कृषी बाजार समिती
धुळे-दादर रेल्वेचा शनिवारपासून शुभारंभ
रावेर कृषी बाजार समिती
रखरखत्या उन्हात वाघुर नदीला.... अवकाळी पुर !
रावेर कृषी बाजार समिती
धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत विक्रमी मतदान

मतदानाच्या आदल्या रात्री मतदारांवर जोरदार लक्ष्मीकृपा झाल्याने तब्बल २५-३० हजार रुपये पाकीट एका मतदाराला मिळाल्याची जोरदार चर्चा तालुक्यात रंगत आहे.आता निकालानंतर सत्ता महाविकास आघाडीची कि भाजपची यावर खुप समीकरण ठरणार आहे .   येथील बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप-शिंदे गट व महाविकास आघाडी यांच्यात झालेली चुरशीची लढत, पॅनल विरुद्ध पॅनल अशी असली तरी,खरे कांगोरे जिल्हा बँक निवडणुकीत माजी आमदार अरुण पाटील यांचा पराभव व जनाबाई गोंडू महाजन यांचा विजय हेच आहे.जिल्हा बँक निवडणुकीत मात्तबर असलेल्या माजी आ.अरुण पाटील यांना अवघ्या एका मताने पराभवाला सामोरे जावे लागले होते.

या निवडणुकीत अरुण पाटील यांना आता जवळ असलेले मात्र त्यावेळी विरोधक समजत असलेले पक्षातीलच नेत्यांच्या खेळीने पराभूत व्हावे लागले होते.हा निकाल रंजक आणि रहस्यमय होता.तितकाच अनेकांना धक्का देणाराही,तर या पराभवाचा उट्टा आगामी निवडणुकीत निघेल असे सूर अस्मानी घुमत होते.मात्र मधल्या काळात कोणत्याच निवडणुका नसल्याने असलेली आग खदखदत होती.आणि मुहूर्त निघाला तो बाजार समिती निवडणुकीचा,सर्वपक्षीय पॅनल तयार होत असतांना,गोंडू महाजन यांना डावलेले जात असल्याने,मंत्री गिरीश महाजन यांनी रावेरातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांना बोलवून गोंडू महाजन असलेले पॅनल बनवा असे आदेश मिळाले.आणि सर्वपक्षीयला पूर्ण विराम मिळाला.त्यामुळे अपरिहार्य कारणास्तव महाविकास आघाडी पॅनल तयार करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी एकवटले.यात माजी मंत्री एकनाथ खडसे व माजी जिप सदस्य रमेश पाटील यांच्या हातात सूत्रे जात असल्याचे राष्ट्रवादीत दिसू लागल्याने,आमदार अरुण पाटील यांना एक प्रकारे कोंडीत पकडण्यात येत असल्याची चर्चा सुरु झाली.   

रावेर कृषी बाजार समिती
यावल कृषी उत्पन्न बाजार समितीत 93.63% मतदान
रावेर कृषी बाजार समिती
पाचोरा बाजार समीतीत १८ जागांसाठी ९८.२२ टक्के मतदान
रावेर कृषी बाजार समिती
अमळनेर : बाजार समिती निवडणुकीत सरासरी ९८.०७ % मतदान

      दुसरीकडे बाजार समिती निवडणूकीत भाजपचे पॅनल निर्माण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या,या निवडणुकीत पॅनल प्रमुख असलेले भाजप जिल्हा उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन,पद्माकर महाजन,किसान मोर्च्याचे संपर्क प्रमुख सुरेश धनके,तालुकाध्यक्ष राजन लासुकर यांच्यासह मान्यवर उमेदवारी करण्यापासून लांब राहिले.कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली.गोंडू महाजन यांना जिल्हा बँकेत मदत करणारे सहकारी व काही नवख्या उमेदवारांना संधी दिली गेली.

तर प्रल्हाद पाटील हे पक्षाचे जेष्ठ नेते म्हणून पॅनलची धुरा सांभाळत होते.त्यांच्या विरोधात आधीच महाविकास आघाडीने सक्षम पॅनल देऊन भाजपला तगडे अव्हान दिले.दि.२८ रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सोसायटी मतदार संघातील एका मतदाराला भाजप-शिंदे गट व महाविकास आघाडी वेगवेगळे मिळून २३ हजार व परिवर्तन पॅनलचे २५००-३५०० काही अपक्षांचे ११०० असे पाकिटे घरपोहाच देण्यात आली. अचानक लक्ष्मी दर्शन होत असल्याने, मतदारांच्या आनंदाला उधाण आले होते.निवडणूक यशवंत विद्यालयात घेण्यात आली.यावेळी इमारतीच्या मुख्य गेटवर दोन्ही बाजूने उमेदवार उभे राहिल्याने मतदारांना खूप विचारपूर्वक मतदार संघ गाठता आले.पैसा व प्रचार या निवडणुकीत शिगेला पोहचलेले दिसून आला.निवडणुकीत अनेक अंदाज बांधले जात आहे.

रावेर कृषी बाजार समिती
बोदवड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ९४.५५ % मतदान

विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहे,मात्र आता काही तासांनी निकाल जाहीर होणार आहे.तत्पूर्वी यंदाची निवडणूक अनेक निवडणुकांचा रेकोर्ड मोडणार आहे.या निवडणुकीच्या निकालाचा दुरोगामी परिमाण रावेरच्या राजकारणावर दिसणार आहे.पैशांचा बेसुमार वापर या निवडणुकीच्या विजयाचा कल दर्शवत आहे. अवघ्या काही तासात निकाल हाती येणार आहे,मात्र या सत्ता संघर्षात बाजार समितींवर सत्ता कुणाची असेल यावर राजकीय विश्लेषक अंदाज मांडत आहे.बाजार समितीवर सत्ता कुणाला मिळेले कि फिफ्टी-फिफ्टी असे होते यासाठी थोडा वेळ थांबव लागणार आहे. बाजार समीतीवर येणार मंडळ हे अनेकांच्या राजकीय कारकीर्दीला आकार देण्यास उपयुक्त ठरणार असुन, सत्ता कुणाची हा प्रश्न मतदारांना बैचेन करत आहे.

रावेर कृषी बाजार समिती
पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीत 97.54% मतदान
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com