वरणगाव फॅक्टरीत काम करताना कंत्राटी कर्मचारी गंभीररीत्या भाजला

वरणगाव आयुध निर्माणीतील घटना
वरणगाव फॅक्टरीत काम करताना कंत्राटी कर्मचारी गंभीररीत्या भाजला

वरणगाव फॅक्टरी, ता.भुसावळ ( Varangaon factory ( वार्ताहर )

वरणगाव आयुध निर्माणी मध्ये रिजेक्शन प्रायमर ( Rejection Primar) जाळत असतांना एक कंत्राटी कर्मचारी (contract worker) भाजला असल्याचे वृत्त आहे.

वरणगाव आयुध निर्माणी लगत असलेल्या दर्यापूर (Daryapur) शिवारात राहणारा ज्ञानेश्वर (नाना) विठ्ठल पाटील (वय ४८) हा गेल्या अनेक वर्षापासुन कंत्राटी पद्धतीने फॅक्टरीत काम करत आहे, मंगळवारी सकाळी काम सुरू झाल्यावर दहा वाजेच्या सुमारास रिजेक्शन प्रायमर जाळत असताना अचानक एक प्रायमर फुटुन इतर जळत असलेले प्रायमर या कर्मचार्‍यांच्या अंगावर उडाले व त्याची आग ज्ञानेश्वर यांना लागली.

या घटनेत ज्ञानेश्वरच्या चेहरा, हाताला, पोटाला व डोळ्याला इजा झाली असुन त्या पदार्थाचे तुकडे शरीरात गेले होते व तो गंभीर जखमी झाला आहे. प्रथम आयुध निर्माणी दवाखान्यात प्रथमोपचार केल्यानंतर त्याला बर्‍हाणपूर येथील ऑल इज वेल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. फॅक्टरी अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असुन चौकशीचे आदेश दिले आहेत.

फॅक्टरीची रुग्णवाहीका जुनी असल्याने पेशंटला तत्काल दवाखान्यात पोहचवु शकत नाही हे लक्षात घेऊन दर्यापूरचे माजी सरपंच पप्पू सोनवणे यांनी मुक्ताईनगरचे आ.चंद्रकांत पाटील यांना दूरध्वनीवरून सदरची माहिती कळवल्यावर चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ वातानुकुलीत ऍम्बुलन्स पाठवून या रुग्णाला मदत केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com