
जळगाव jalgaon। प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील 23 वर्षीय तरुणाला क्रेडीट कार्डवर (credit card) 5 हजार रूपयांचे ऑनलाईन शॉपींग व्हाऊचरची ऑफर (Online Shopping Voucher Offer) असल्याचे सांगत क्रेडीट कार्डची माहिती विचारून आलेल्या ओटीपी च्या माध्यमातून 7 लाख 60 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा (Online Ganda) घातल्याचा प्रकार उघडीक आला आहे. याबाबत शुक्रवारी सायबर पोलिस ठाण्यात ठगाविरूध्द गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे मिलींद प्रकाश पाटील यांनी डिसेंबर महिन्यात क्रेडीट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. काही दिवसांने तरूणाला क्रेडीट कार्ड मिळाले होते. 18 जानेवारीला अनोळखी मोबाईल क्रमांकावरून मिलींद पाटील यांना एक फोन आला. या व्यक्तीने पर्सनल लोनसाठी विचारपूस केली. मात्र पाटील यांनी नकार देवून फोन कट केला. पुन्हा त्याच क्रमांकावरून 19 जानेवारी रोजी दुपारी फोन येत मिलींद पाटील यांना तुमच्या क्रेडीट कार्डवर 5 हजार रूपयांचे ऑनलाईन शॉपींग व्हाऊचरची ऑफर आहे. हे व्हाऊचर वापरण्यासाठी मोबाईलवर पाठविला ओटीपी क्रमांक सांगितला.
90 हजार रुपये ही गेले
ओटीपी क्रमांक सांगितल्यावर तरूणाला बँक खात्यातून रक्कम डेबिट झाल्याचा मॅसेज आला. तरूणाने लागलीच बँक गाठून संपूर्ण प्रकार सांगितल्यावर त्याच्या खात्यावर 18 जानेवारीला पर्सनल लोन क्रेडीट झाले असून ही रक्कम पश्चिम बंगाल येथील पवन कुमार नावाच्या व्यक्तीच्या खात्यावर ट्र्रान्सफर झाल्याचे बँकेकडून सांगण्यात आले. तसेच तरूणाच्या बँक खात्यातील 90 हजाराच्या रक्कम सुध्दा काढले.