चेसीसीसह इंजीन नंबर आला कोठून ?

उप-प्रादेशीक परिवहन विभागातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना निष्काळजीपणा भोवणार
चेसीसीसह इंजीन नंबर आला कोठून ?
jalgaon rto office

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

भुसावळचे आमदार संजय सावकारे (MLA Sanjay Saavkare) यांची कार (Car) परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांच्या नावावर ट्रान्सफर (Transfer) झाला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. परंतु वाहन ट्रान्सफर करतांना चेसीस व इंजीन नंबर (Chassis and engine number) आवश्यक असतो. तो संबंधित कारमालकाच्या आधार मोबाईलशी लिंक असतो. परंतु तो कार ट्रान्सफर करणार्‍यांकडे गेला कसा असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. तसेच या प्रकरणात निष्काळजीपणा (Negligence) करणार्‍या अधिकारी व कर्मचर्‍यांवर कारवाई होणार असल्याचा इशारा परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे (Transport Commissioner Dr. Avinash Dhakne) यांनी दिला आहे.

आमदार संजय सावकारे यांची एमएच 19 सी झेड 5130 क्रमांकाची टोयाटो कंपनीची कार परिवहन मंत्री अनिल परब यांच्या नावावर ट्रान्सफर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी परिवहन आयुक्तांनी संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशीचे आदेश दिले असून त्यांना नोटीस देखील बजाविण्यात आली आहे. त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. त्यांच्या खुलास आल्यानंतर याप्रकरणात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याच माहिती परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली.

ट्रान्सफरची प्रक्रिया ओटीपी शिवाय अशक्य

वाहन ट्रान्सफकरत असतांना वाहन क्रमांकासोबत संबंधित वाहनमालकाचा मोबाईल व आधार लिंक असतो. हे करत असतांना संबंधिताच्या मोबालाईव ओटीपी येत असतो. हे महाराष्ट्रात करणे सहजासहजी शक्य नसून ते परराज्यातून झाले आहे. ती कार कोणत्या ठिकाणाहून कोणत्या संगणकावरुन व किती वाजता झाली हे करणार्‍याचा मोबाईल क्रमांक देखील हे समजत असून ते तपासात निष्पन्न होणार असून याप्रकरणी पोलीस चौकशी करीत आहे.

दोषी अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांवर होणार कारवाई

उप-प्रादेशिक कार्यालयात संबंधित व्यक्तीचे कागदपत्रे आली त्यावेळी ती संबंधित कर्मचार्‍याने व्यवस्थीत बघून खात्री करुनच घेतली पाहिजे. परंतु या प्रकरणात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून निष्काळजीपणा केला गेला असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. संबंधितांची चौकशी सुरु असून त्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. जे कोणी याप्रकरणात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

काम करतांना खातरजमा करुन कागदपत्रे बघणे अपेक्षीत आहे. याबाबतचे लेखी आदेश देखील त्यांना देण्यात आले आहे. परंतु याप्रकरणात अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांकडून निष्काळजीपणा झाला असल्याचे प्रथमदर्शीनी दिसून येत आहे.

डॉ. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com