अन् पाडळश्याची हरविलेली महिला नागपुरला सापडते तेव्हा...

फैजपूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी : महिलेला सुखरूप कुटुंबियांच्या स्वाधीन केले
अन् पाडळश्याची हरविलेली महिला नागपुरला सापडते तेव्हा...

पाडळसे- Padalse वार्ताहर

येथील महिला (Women) दोन लहान मुलीसह (two little girls) दि.20 डिसेंबर रोजी हरवली (Lost) होती. या संदर्भात फैजपुर पोलीस स्टेशनमध्ये (Faizpur Police Station) हरविल्याची तक्रार कुटुंबियांनी (family) दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासचक्रे फिरवत सदर महिलेस शोधून काढून मुलींसह सुखरूप कुटूंबियांच्या स्वाधिन केले.

असा लागला तपास

पोलिस स्टेशनला दाखल तक्रारीनुसार एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. मोबाईल लोकेशन द्वारे व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस नाईक किरण चाटे , महेश वंजारी , विकास सोनवणे यांनी नागपुर मधील सीताबर्डी येथे जाऊन सदरील महिलेचा शोध घेतला. तेथून तिला तीच्या दोन लहान मुलींसह फैजपुर पोलीस स्टेशन आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. दोन लहान मुली व महिलेला परिवाराच्या स्वाधीन केल्यामुळे फैजपूर पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com