धरणगावच्या गायरानचा प्रश्न थेट लोकसभेत पोहचतो तेव्हा..

खासदार उन्मेश पाटलांनी शब्द पाळला
धरणगावच्या गायरानचा प्रश्न थेट लोकसभेत पोहचतो तेव्हा..

धरणगाव Dharangaon (प्रतिनिधी)

दि.१३ डिसेंबर रोजी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात (winter session)

खासदार उन्मेश पाटील (MP Unmesh Patil) यांनी महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi government) काळात सरकारच्या गायरानावर(Government Guyran) मोठया प्रमाणात अतिक्रमण (Encroachment) होत आहे, याकडे लक्ष वेधत सरकारला कायदा करण्याचे आवाहन केले. धरणगाव येथे गायरान बचाव मंचच्या विशाल मोर्चाप्रसंगी, त्यानी हा प्रश्न संसदेत(Question in Parliament) नेईन असे आश्वासन दिले होते. जे खा. पाटील यांनी प्रत्यक्षात आणून आपला शब्द पूर्ण केला.

आपल्या मतदारसंघातील धरणगाव येथे साधू संत महंत आणि गोप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून निषेध करीत आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले. जागतिक हवामान बदलाच्या संकटाला आपण सामोरे जात आहोत, या संकटातून मुक्ती मिळवण्याकरता एक पर्याय म्हणून तसेच इकोलॉजी व इकॉनॉमी स्थिर होण्याकरिता गायरान वाचविणे अतिशय महत्वाचे असून या करिता धोरण व कायदा होणे गरजेचे असल्याचे मत खासदार पाटील यांनी लोकसभेत व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी झीरो बजेट फार्मिंगचे धोरण आखून देशातील शेतकऱ्यांसाठी निसर्गशेती, विना रासायनिक शेती, कमी खर्चातील शेतीचे धोरण आणि सेंद्रिय खा, निरोगी रहा ! नारा यशस्वी होण्यासाठी संयुक्त प्रयत्न होण्याची अपेक्षा खासदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.

खासदारांनी थेट संसदेतच प्रश्न उपस्थित केल्याने अधिकाऱ्यांची झोप उडणार असून, या प्रश्नाला न्याय मिळेल अशी आशा गायरान बचाव मंचने व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.