भुसावळच्या पटेल कॉलनीत आयजी पथकाचा छापा पडतो तेव्हा....

 भुसावळच्या पटेल कॉलनीत आयजी पथकाचा छापा पडतो तेव्हा....

भुसावळ Bhusawal । प्रतिनिधी

येथील पटेल कॉलनीत (Patel Colony) कित्येक वर्षांपासून गॅस रिफिलिंगचा (Gas refilling) अवैध व्यवसाय (Illegal business) सुरू असून आज रोजी पटेल कॉलनीत दि. 11 नोव्हेंबर रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत आयजी पथक (IG squad) दाखल झाले असून नऊ गॅस सिलेंडर व एक गॅस भरण्यासाठी वापरण्यात आलेली मशीनसह आरोपींना आयजी पथकाने छापा (raids) टाकून ताब्यात घेण्यात आले आहे.

जळगाव जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांनी डोके वर काढल्याने काही दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने जळगाव स्थनिक गुन्हे शाखा पथकाने कारवाईस सुरुवात केली आहे. खरी तर सुरुवात भुसावळ शहरातून होणे गरजेची होती. पण आयजी पथकाने भुसावळ शहरात येऊन बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलिंग व्यवसायिकांवर छापा टाकून नऊ गॅस सिलेंडर, एक गॅस भरण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन व दोन रिक्षासह तीन संशयित आरोपी ताब्यात घेऊन मुद्देमाल बाजारपेठ पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे.

या कारवाईमुळे शहरातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे. आयजी पथक भुसावळ शहरात कुठे कुठे कारवाई करणार? हे पथक अवैध धंदे मालकांवर कारवाई करणार की नेहमीप्रमाणे काम करणार्‍या गरीब रोजंदारीने काम करणार्‍यांवर कारवाई करणार याकडे नागरीकांचे लक्ष लागून आहे.

भुसावळ महसूल विभागाचे पुरवठा अधिकारी आतातरी कुंभकर्णी झोपेतून जागे होऊन घरगुती गॅस सिलेंडर वापरणार्‍या भुसावळ शहरातील हॉटेल व्यवसायिक व केटरिंग व्यवसायिक यांच्यावर कारवाई करणार का? ही एक संशोधनांची बाब आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यत सुरू होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com