रात्री गस्तीवर असलेले डिवायएसपीं अवैध वाळूचे डंपर पकडतात तेव्हा...

शहर, रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ...
रात्री गस्तीवर असलेले डिवायएसपीं अवैध वाळूचे डंपर पकडतात तेव्हा...

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

शहरातील शिवकॉलनी व बेंडाळे चौकात अवैध वाळूची वाहतुक (illegal sand dumpers) करणार्‍या डंपरवर रात्रीच्या वेळी गस्तीवर (night patrol) असलेल्या पोलीस उपअधीक्षकांनी (DySP) कारवाई केली. याप्रकरणी रामानंद नगर व शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतुक करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

शहरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूची वाहतुक केली जात आहे. दिवसरात्र नदीपात्रातून वाळूचा उपसा करुन शहरातील विविध भागांमधून दिवसरात्र अवैध वाळूची वाहने सुसाट वेगाने धावतांना दिसून येत आहे.

दरम्यान, सोमवारी रात्रीच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संदीप गावित हे रात्रीच्या वेळी गस्ती असतांना त्यांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास शहरातील नेहरु चौकाकडून टॉवरचौकाकडे (एमएच 19 सीवाय 6671) क्रमांकाचे डंपर भरधाव वेगाने येत होते. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी हे डंपर थांबविण्यास सांगितले. परंतु डंपरचालकाने भरधााव वेगाने डंपर चालवून तो पळून जात होता.

रात्री गस्तीवर असलेले डिवायएसपीं अवैध वाळूचे डंपर पकडतात तेव्हा...
Photos # गुढयात शिक्षक व इंजिनिअर पिता- पुत्रांनी फुलवला ड्रॅगन फ्रुटचा मळा

दरम्यान, पोलिसांच्या पथकाने डंपरचालकाचा पाठलाग करुन ते डंपर बेंडाळे चौकात पकडले. त्याची विचारपूस करीत परवानाबाबत विचारणा केली परंतु त्याने परवाना नसल्याचे सांगत डंपरमालकाचे नाव किरण पाटील रा. ज्ञानदेव नगर असे सांगितल्यानंतर तो तेथून पळून गेला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास विजय निकुंभ हे करीत आहे.

रात्री गस्तीवर असलेले डिवायएसपीं अवैध वाळूचे डंपर पकडतात तेव्हा...
VISUAL STORY : बॉलिवूडचा हा भाईजान झाला 57 वर्षाचा

वाळूमाफियांचे धाबे दणाणले

पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी मध्यरात्री व पहाटेच्या सुमारास गस्ती दरम्यान, अवैध वाळू वाहतुक करणार्‍यांवर कारवाई केल्यामुळे वाळू माफियांचे धाबे चांगलेच दणाणून गेले आहे.

रात्री गस्तीवर असलेले डिवायएसपीं अवैध वाळूचे डंपर पकडतात तेव्हा...
VISUAL STORY :केवळ तुनिषाचं नव्हे तर 'या' अभिनेत्रीनींही संपवलं आयुष्य..
रात्री गस्तीवर असलेले डिवायएसपीं अवैध वाळूचे डंपर पकडतात तेव्हा...
VISUAL STORY : या वर्षात कोणकोणत्या सेलिब्रेटींनी बांधली रेशीम गाठ

शिवकॉलनीजवळ पकडले दुसरे डंपर

शहरात गस्त घालीत असतांना पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांना शिवकॉलनीतून (एमएच 19 झेड 6060) क्रमांकाचे वाळूचे डंपर सुसाट वेगाने जातांना दिसले. त्यांनी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास या डंपरचालकाला थांबवून त्याच्याकडे परवाना बाबत विचारणा केली. यावेळी त्याने कुठलाही परवाना नसल्याचे सांगितले. दरम्यान, डंपरमधील तिघांची विचारपूस केली असता, डंपरमालक गोपाल पारसकुमार ठाकूर (रा. कोठारी नगर), चालक समाधान भावलाल पाथरवट व किन्नर किशोर कैलास कोळी (दोघ रा. साकेगाव ता. भुसावळ) असे सांगत डंपर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुनिल पाटील हे करीत आहे.

रात्री गस्तीवर असलेले डिवायएसपीं अवैध वाळूचे डंपर पकडतात तेव्हा...
VISUAL STORY : मानसी अन् प्रदीप मध्ये सुरू झालेय सोशल मीडिया वॉर
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com