बिबट्या वनमजुरांचा पाठलाग करतो तेव्हा...

सोयगाव तालुक्यातील घटना
बिबट्या (संग्रहित छायाचित्र)
बिबट्या (संग्रहित छायाचित्र)

सोयगाव, Soygaon

राखीव वनक्षेत्रात जाळपट्ट्यांचे काम करणाऱ्या दोन वनमजुरांचा (forest laborer) बिबट्याने (leopard) तब्बल दहा मिनिटे पाठलाग (Chase) करून त्यांना तावडीत घेण्याचा मोठा प्रयत्न केला. परंतु वन मजुरांनी तातडीने सावध पवित्रा घेतल्याने मोठा अनर्थ टळला. असल्याची घटना जरंडीच्या चिंचखोरी शिवारात घडली आहे. या शिवारात जवळच असलेल्या शेतकरी दिलीप पाटील (Farmer Dilip Patil) यांनी या दोन्ही वनमजुरांना बिबट्याच्या कचाट्यातून सुटका करण्यास (Help to get rid of) मदत केली.

जरंडी शिवारातील चिंचखोरी शिवारात राखीव वनक्षेत्रात जाळपट्टे घेण्याचे काम करत असताना दोन वनमजुरांना माकडांच्या टोळक्यांच्या मागावर असलेला बिबट्या आढळला माकडांच्या टोळक्यांनी या बिबट्याला चकमा देत उंच असलेल्या झाडाच्या शेंड्यावर चढून गेल्याने माकडांच्या टोळक्यांनी बिबट्याच्या तावडीतून सुटका करून घेतली मात्र चवताळलेल्या बिबट्याने या दोन वनमजुरांचा पाठलाग सुरु केला या दोघांनी आरडा ओरडा करत जीव वाचविण्यासाठी धावत सुटल्यावर बिबट्या मागे आणि वनमजूर पुढे असा तब्बल दहा मिनिटे बिबट्या आणि वनमजुरांचा पाठशिवणीचा खेळ चिंचखोरी शिवारात सुरु असतांना शेतकरी दिलीप पाटील यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी बिबट्याच्या पाठशिवणीचा खेळ प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर त्यांनी या वन मजुरांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला व अखेरीस बिबट्याच्या कचाट्यातून धावत सुटलेल्या वनमजुरांची सुटका झाली.

बिबट्या मागावर आणि वनमजूर पुढे दहा मिनिटाचा थरार-

राखीव वनक्षेत्रात कामा करणाऱ्या या दोन्ही वनमजुरांवर हल्ला करण्याच्या तयारीत असलेला बिबट्या मागे आणि वनमजूर जीव वाचविण्यासाठी पुढे धावत सुटल्याचा दहा मिनिटाचा थरार चिंचखोरी शिवारात सुरु होता या घटनेत वनमजुरांना केवळ जीव वाचविण्याची कसरत करावी लागली

वन विभागाला रात्री अपरात्री राखीव वनक्षेत्रात कामा करावे लागते परंतु कर्मचाऱ्यांना व वनमजुरांना स्वतःच्या सुरक्षेसाठी कोणतेही साहित्य वनविभागाच्या वरिष्ठांकडून देण्यात येत नाही त्यामुळे वन कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात वन क्षेत्रात कामा करावे लागते सध्या घनदाट झाडीच्या ठिकाणी वन कर्मचाऱ्यांना गस्त घालावी लागत आहे.त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आणि वनमजुरांना सुरक्षेसाठी किमान सुरक्षेसाठी साहित्य देण्यात यावे अशी मागणी होत आहे.

शिकारी साठी आलेला बिबट्या चवताळलेल्या अवस्थेत

शिकारीसाठी आलेल्या बिबट्याच्या तावडीतून माकडांचे टोळके सुटल्यावर चवताळलेल्या बिबट्याला समोरच वनमजूर आढळल्याने बिबट्याची शिकारीची उत्तेजना आणखीनच वाढल्याने या बिबट्याने थेट वन मजुरांचा पाठलाग केला.अखेरीस वनमजुरांनी बिबट्याच्या तावडीतून सुटका केल्यावर मात्र चवताळलेला बिबट्या गुरगुर करत घनदाट झाडीत घुसला असल्याचे वन मजुरांनी सांगितले.

वन मजुरांनी केले इतरांनाही सावध

स्वतःचा जीव वाचावीत धावणाऱ्या वन मजुरांनी मात्र परिसरातील शेती शिवारातील मजुरांनाही सावध करत बिबट्या आला पळा.पळा अशी आरडा ओरडा केल्याने या मजुरांनी इतरांनाही सावध केल्याने या दोघांचे कौतुक होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com