महाराजा रणजीत सिंगांच्या पुतळ्याचे स्वागत

महाराष्ट्रातून पुतळा पंजाबकडे रवाना
महाराजा रणजीत सिंगांच्या पुतळ्याचे स्वागत

चाळीसगाव chalsigaon प्रतिनिधी

शेर ए पंजाब नावाने संपूर्ण देशात ओळखले जाणारे वीर शिरोमणी महापराक्रमी पंजाबचे राजे महाराजा रणजीतसिंग (Maharaja Ranjit Singh) यांचा पुर्णाकृती पुतळा सोलापूर (solapur) येथून पंजाब (Punjab) मधील मुख्यमंत्री भगवंतसिंग मान (Chief Minister Bhagwant Singh Hon) यांच्या मतदारसंघातील संगरुर या जिल्ह्याच्या ठिकाणी बसवण्यासाठी महाराष्ट्रातून पंजाबात जात असताना चाळीसगाव कन्नड घाटाच्या पायथ्याशी सह्याद्री प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या पुतळ्याचे व पुतळा पोहोचवण्यासाठी जाणार्‍या शेखर शहाणे व महेश शहाणे या दोघा कलाकार बंधूंचे स्वागत केले.

महाराजा रणजीतसिंग यांचा पुतळा शिल्पतरु या सोलापूर येथील पुतळे बनवणार्‍या आर्ट फर्ममध्ये तयार झाला असून शेखर शहाणे व महेश शहाणे या दोघा बंधूंनी या पुतळ्यास पूर्ण रूप दिले आहे. पुतळा एकूण ३.५ टन वजनाचा असून अत्यंत भव्यदिव्य अशा स्वरूपात निर्माण झालेला आहे. येत्या काही दिवसात पंजाबातील सगरुर येथे या पुतळ्याचे लोकार्पण मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, डिगंबर शिर्के, गजानन मोरे, विनोद शिंपी, रविंद्र दुसिंग, योगेश शेळके, नाना चौधरी, गणेश पाटील, भाऊसाहेब पाटील, सचिन पाटील, पैलवान बबलू चव्हाण, अभिषेक गुंजाळ, दिपक दाभाडे, एस.बी.चव्हाण, रविंद्र कोष्टी आदि उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com