Video शिवपुतळा स्वागतासाठी उसळला जनसागर

अश्वारुढ पुतळ्याचेे बहुप्रतिक्षेनतंर चाळीसगावात स्थापना, अनेक वर्षाची झाली स्वप्नपूर्ती, अभिषेकासाठी बरसल्या जलधारा, पोलीसांचा तगडा बंदोबस्त

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

चाळीसगाववासीयांची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती पूर्ण झाली असून,शिवाजी महाराज चौकातील(सिग्नल चौकात) नियोजित अश्वारूढ पुतळ्याचे आगमन बहुप्रतिक्षेनतंर रविवारी( दि,२६) शहरात मोठ्या जल्लोषात झाले. शिवपुतळा भव्य मिरवणुकीद्वारे पारंपरिक पद्धतीत छत्रपती शिवाजी महाराज चौकातील आण्यात आला. व नतंर चंबुतरावर त्याची विधीवत पद्धतीने स्थापना करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आगमन समिती व नगरपरिषदेच्या पुढाकाराने ढोल-ताशा, मर्दानी खेळ, लेझीम व झांजपथक, टाळ-मृदंगच्या गजरात जल्लोषपूर्ण वातावरणात पारंपरिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची भव्य मिरवणूकीस तालुक्यातील पिलखोड येथून संकाळी ९ वाजता काढण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. हजारोंच्या संख्येने शिवप्रेमी उपस्थितीत तालुक्यातील टाकळी प्र.दे, आडगाव, देवळी, बिलाखेड या गावातून पारंपारिक वेशभूषेत सजलेली बच्चेकंपनी व महिलांचा सहभाग असलेली मिरवणुक शहरात आली. शहरातील मुख्य मार्गावर चौकाचौकात दुतर्फा भगवे झेंडे व लावण्यात आले होते. स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या, तसेच शिवप्रतिमांचे ठिकठिकाणी पूजन करुन आतिषभाजी करण्यात आली. शहरात पुतळ्याचे आगमन झाल्यानतंर जयघोषात व फटक्यांच्या आतिषभाजी व ढोल-ताशाच्या गजरात शिवपुतळ्याचे स्थापना नियोजित जागेत करण्यात आली. याप्रसंगी खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आभिषेकासाठी बरसल्या जलधारा-

लाखो चाळीसगाववासीयांची अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती रविवारी पूर्ण झाली आहे,चाळीसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याची नाशिक येथून मोठ्या थाटामाटात आगमन झाले. आगमन झाल्यानतंर अवघ्या काही वेळात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालण्यासाठी पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. तसेच आपल्या राजाच्या आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त व महिला भरपावसात उभे होते.

खासदार-आमदारांनी धरला ठेका

शिवपुतळ ज्या गावामधून येत होता. त्या गावातील चौका-चौकत शिवपुतळ्याचे पुजन करण्यात आले. तसेच ढोल-ताशा गजरात शिवपुतळ्याचे स्वागत करण्यात आले. यावेळी जमलेल्या तरुणानी ढोला-ताशाच्या गजरात ठिक-ठिकाणी नृत्य करीत होती. खासदार उन्मेष पाटील व आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील तरुणाच्या सोबत महाराजांच्या स्वागतासाठी ठेका धरत तरुणाईची मने जिकंलीत.

फुलांची भव्यसजावट

शिवनेरी फांऊडेशनच्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील व इतर महिलांना शिवपुतळा बसविण्यासाठी तयार करण्यात आलेला चबुतरा व आजुबाजूचा संपूर्ण परिसर रात्रीपासूनर्च फुलानी सजवला होता. त्यामुळे संपूर्ण सिग्नल चौक शिवमय झाला होता, या फुलांची आरस दिवसभर सोशल मिडियावर चर्चेचा विषय राहिला.

यांची होती उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा आगमन प्रसंगी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे यांच्यासह माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी आमदार राजीव देशमुख यांनी पुतळ्याचे पूजन व स्वागत केले. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, जिल्हा दुध संघाने प्रमोद पाटील, विश्‍वास चव्हाण यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व मोठ्या संख्येने शिवभक्त, सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पोलीसांचा तगडा बंदोबस्त

कोवीडची नियमवलीत शिवपुतळाचे चाळीसगाव आगमन होणार असल्यामुळे चाळीसगाव शहरासह ग्रामीण भागात संकाळपासून पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्तासाठी १ डीवायएसपी, १ पोलिस निरिक्षक, सहा पीएसआय, १ आरसी प्लाटून यासह तब्बल ११० कर्मचारी उपस्थित होते. तगडा पोलीस बंदोबस्तामुळे शिवाजी महाराजांच्या मिरणूकीत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com