विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे : आनंदराज आंबेडकर

विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे : आनंदराज आंबेडकर

जळगाव jalgaon (प्रतिनिधी)

धर्म आणि जातींची झापडे काढून देशातील विषमता नष्ट (Heterogeneity destroyed) करण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे विचार आत्मसात (Assimilated) करित तरुणांनी विशेषत: शिक्षीत समाजाने (educated society) चाकोरीच्या पलिकडे (Beyond Chakori) जाऊन विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन इंदू मिल आंदोलनाचे प्रणेते (founder of the Indus Mill Movement) आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात (Poet Bahinabai Chaudhary at North Maharashtra University) ११ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत महात्मा फुले (Mahatma Phule) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) जयंती महोत्सव (Jayanti Festival) साजरा करण्यात येत आहे.

या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवार दि.१२ रोजी “आंबेडकरी चळवळीचे विविध आयाम आणि आव्हाने ” (“Different dimensions and challenges of the Ambedkarite movement) या विषयावर आनंदराज आंबेडकर यांनी सिनेट सभागृहात आपले विचार मांडले. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे , (In-charge Vice-Chancellor Prof. ST Ingle) प्रा.म.सु.पगारे, प्रा. अनिल डोंगरे यांची उपस्थिती होती.

श्री. आंबेडकर म्हणाले की, २५०० वर्षापूर्वी गौतम बुध्दांनी (Gautama Buddha) माणसाने माणसासोबत कस जगाव हा विचार रुजविला. बाबासाहेबांनी हाच विचार घेऊन समाजिक कार्य केले. देशावर अनेक राजवटींची आक्रमणे झाली. त्यामुळे देशाचा इतिहास गुलामगिरीचा (History of the country Slavery) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) स्वातंत्र्यांची ओळख निर्माण करुन दिली. त्यांनी सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन राज्यकारभार केला.

श्री. आंबेडकर पुढे म्हणाले की, आपल्याला जे सांगितले जाते त्यावर आपण विश्वास ठेवतो. खर तर आपण चौकस राहून सत्यता पडताळली (Verification verified) पाहिजे. तरुणांनी सोशल मिडीयाच्या (Social media) पुढे जाऊन देशात काय घडत आहे याची माहिती घेतली पाहिजे. बाबासाहेबांनी (Dr. Babasaheb Ambedkar) समाजातील अन्यायग्रस्तांकरीता कार्य केले. त्यामुळे कामगार, महिला, शेतकरी यांसह विविध वर्गातील लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक झाली. बहुजनांनी जागृत असणे आवश्यक आहे. संविधानामुळे (Constitution) देश एकसंघ राहिला. धर्मा धर्मात शत्रुत्व नसावे.

शिक्षित समाजाने चाकोरीबाहेर जाऊन देशाच्या प्रगतीचा विचार (idea of progress) केला पाहिजे. समता, बंधुत्व या विचारांमुळे देश अखंड राहतो. जाती धर्माची झापड काढून टाकून बाबासाहेबांचे (Dr. Babasaheb Ambedkar) विचार अंगीकारले पाहिजे असे ते म्हणाले. त्यांनी यावेळी बाबासाहेबांनी केलेल्या विविध कार्यांची माहिती दिली.

अध्यक्षीय समारोप करतांना प्रभारी प्र-कुलगुरु प्रा. इंगळे म्हणाले की, सशक्त राष्ट्रासाठी (strong nation) महापुरुषांचे विचार समजून घेतले पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, परिचय व सूत्रसंचालन प्रा.विजय घोरपडे यांनी तर आभार डॉ. पवित्रा पाटील यानी मानले. या व्याख्यान प्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

या महोत्सावात विद्यापीठात उद्या सकाळी रक्तदान शिबीराचे (Blood donation camp) आयोजन करण्यात आले आहे. यावेळी कुलगुरु प्रा.व्ही.एल. माहेश्वरी हे शिबीरास भेट देणार आहेत. दुपारी २.३० वाजता शाहिर धूरंधर (Shahir Dhurandhar) यांचा शाहिरी जलसा (Shahiri Jalsa) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.किेशोर पवार यांची उपस्थिती राहील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com