आम्ही गद्दार नव्हे खुद्दार....

32 आमदारांनंतर मी जाणारा 33 वा आमदार, आदित्य ठाकरेंच्या टीकेला ना.गुलाबराव पाटलांचे उत्तर
गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

टीका केल्याशिवाय (Without criticism) आता दुसरे काहीही काम राहिलेले नाही. शिवसेना वाचविण्यासाठीच (save the Shiv Sena) आम्ही उठाव केला आहे. त्यामुळे आम्ही गद्दार नव्हे तर खुद्दार (Not a traitor, but a traitor) असल्याचे प्रत्युत्तर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील (Water Supply and Sanitation Minister No. Gulabrao Patil) यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना दिले आहे.

गुलाबराव पाटील
प्राध्यापकांंचे तीन महिन्यांपासून पगार रखडले

युवासेना प्रमुख आ.आदित्य ठाकरे यांचा शनिवारी जिल्हा दौरा झाला. या दौर्‍यात पाचोरा, एरंडोल, धरणगाव येथे त्यांनी सभा घेतल्या. सभांमधून शिवसेना सोडून जाणार्‍या बंडखोरांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. बंडखोरांना गद्दार ही उपमा देत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर जोरदार हल्ला चढविला होता.

गुलाबराव पाटील
यावल तालुक्यातील आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तक पाच महिन्यांपासून मानधनाच्या प्रतिक्षेत
गुलाबराव पाटील
सोळा वर्षांपूर्वी अतिवृष्टीत वाहून गेलेल्या पाझर तलावाचे काम मंजुरीनंतरही अपूर्णच

ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनीही तितकेच जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आ. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, पक्ष वाढविण्यासाठी त्यांना आता दौरे करावे लागत आहे. हीच गोष्ट आम्ही अडीच वर्षांपासून सांगत होतो. तुम्ही तरुण आहात, मंत्री आहात राज्यात दौरे केले पाहीजे असे अनेकवेळा सांगितले मात्र, त्यांनी ऐकले नाही.

गुलाबराव पाटील
बोगस टीईटी प्रमाणपत्रप्रकरणी जिल्ह्यातील 138 शिक्षकांच्या पगारावर टाच !

शिवसेनेतून सांगून निघणारा मी एकमेव आमदार आहे. उध्दव ठाकरे यांच्याकडे 20 आमदार घेवून गेलो होतो. पक्षातील आमदारांच्या नाराजीबाबत त्यांना सांगितले देखील होते. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. अखेर 32 आमदारांनंतर मी जाणारा 33वा आमदार होतो. आदित्य ठाकरे यांनी आधिच दौरे केले असते तर ही वेळ आलीच नसती. शिवसेना वाचविण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत असेही ना. गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

गुलाबराव पाटील
Murder : जळगावात तरुणाचा भरदिवसा निर्घृण खून

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com