गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग ; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

जळगाव - jalgaon

आज दि.16 जुलै 2022 रोजी दुपारी 12 वाजता गिरणा धरण (girana dam) हे 91.80 टक्के भरणार असून धरण सुरक्षितततेच्या दृष्टीने वरून येणारे जास्तीचे पुराचे पाणी खाली गिरणा नदी (Girna River) पात्रात सोडण्यात येणार आहे. त्याकरिता गिरणा धरणाचे 2 वक्रद्वारे 1 फुटाने उघडण्यात येणार आहे.

त्याद्वारे नदीपात्रात एकूण 2476 (Cusecs) (70.11 Cumecs) पाण्याच्या विसर्ग गिरणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता पाण्याचा विसर्ग कमी जास्त करण्यात येईल. तरी नदीकाठावरील नागरिकांनी नदीत जाऊ नये व तसेच गुरे ढोरे नदीजवळ नेऊ नये. तरी सर्व नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, अशी विनंती (Girna Irrigation Department) गिरणा पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन (District Administration) जळगाव जिल्हा मार्फत करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com