जळगाव शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने

जळगाव शहरातील पाणीपुरवठा एक दिवस उशिराने

जळगाव । jalgaon

शहराला पाणी पुरवठा (Water supply) करणार्‍या वाघूर धरणावरील (Waghur Dam) 33 केव्ही उच्चदाब वाहिनीवरील केबल दुरुस्तीचे (Cable repair) काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील रविवारी होणारा नियोजीत पाणीपुरवठा (Planned water supply) एक दिवस उशिराने (One day late) होणार आहे.

शहराला वाघूर धरणावरुन पाणीपुरवठा केला जात असतो. याठिकाणावरील 33 केव्हीच्या उच्चदाब वाहिनीविरील केबल दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे वाघूर पंपींग स्टेशला होणारा वीजपुरवठा दि. 27 रोजी बंद राहणार आहे. यामुळे जलशुद्धीकेंद्र येथील अमृत योजनेतंर्गत कामे हाती घेण्यात आली असल्याने शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. यामध्ये दि. 27 रोजी होणारा पाणीपुरवठा दि. 28 रोजी तर दि. 28 रोजी होणार नियोजीत पाणीपुरवठा दि. 29 रोजी तर दि. 29 रोजी होणार नियोजीत पाणीपुरवठा दि. 30 रोजी होणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे शहर अभियंता व्ही. ओ. सोनवणी यांनी पत्रकान्वये दिली आहे.

Related Stories

No stories found.