धानोरा येथे बारा दिवसाआड मिळते पाणी

ग्रामस्थांमध्ये संताप. उपाय योजना करण्याची मागणी.
धानोरा येथे बारा दिवसाआड मिळते पाणी

धानोरा Dhanora ता. चोपडा- वार्ताहर

बऱ्हाणपुर -अंकलेश्वर महामार्गावरील (Barhanpur-Ankleshwar highway) चोपडा तालुक्यातील धानोरा (Dhanora) हे पुर्व भागातील जवळपास गाव पंधरा हजार लोकवस्तीचे गांव असून येथे भीषण पाणीटंचाई (Severe water scarcity) जाणवत आहे. ग्रामस्थांना बारा दिवसाआड (around 12 days) पाणीपुरवठा होत जात असल्याने पाण्याची मोठी भटकंती करण्याची वेळ ग्रामस्थांवर (villagers) आली आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की धानोरा हे मोठ्या लोकसंख्येचे गाव‌ आहे.त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन (Water planning) करणं महत्त्वाचं आहे. मात्र नियोजनाचा अभाव व त्यातच नैसर्गिक समस्या यामुळे येथे पाण्याची भीषण टंचाई (Severe water scarcity) निर्माण होऊन तब्बल बारा दिवसाआड (around 12 days) पाणीपुरवठा होत आहे. पाण्यासाठी ग्रामस्थ आपल्या परिवारातील आबालवृद्धांसह रात्रभर पाण्याच्या शोधात भटकंती करताना दिसत आहे.

मजूरवर्गाला तर याचा अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.दिवसभर भर उन्हात राबराब राबून घरी आल्यावर वर पुन्हा पाण्यासाठी इकडेतिकडे धावपळ करावी लागते.

छोट्या छोट्या व्यावसायिकांना तर जाररूपी पाणी विकत घेऊन आर्थिक फटका (Economic blow) सोसावा लागत आहे.संध्या परिसरात खालावलेली पाणी पातळी,विजेची समस्या आदी संकट ही आहेत.मात्र त्यावर मात करून मार्ग काढण्यासाठी ग्राम पंचायत प्रशासन कमी पडत असल्याचे बोलले जात आहे.तर दुसरी कडे गावातील काही लोकांनी अवैधपणे डबल कनेक्शन घेतलेले आहे ते बंद करावे अशी मागणी होत आहे.

गेल्या दोन महिन्यापासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत आहेत. तसेच सार्वजनिक गल्लीतील नळांना काही वेळ पाणी आल्यानंतर नागरिकांमध्ये वाद विवादही होत असतात.

गावातील गटारीत पाणी वहात नसल्यामुळे घाणही साचली असून त्यातून दुर्गंधी येत आहे त्याचा परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता ही बळावली आहे. म्हणून ग्रामपंचायतीने (Gram Panchayat) पाण्याचे व्यवस्थित नियोजन करून पाण्याची निर्माण झालेली गंभीर समस्या सोडवावी.टॅन्कर तसेच विहीर, कुपनलिका अधिग्रहण करून पाणी समस्या सोडवावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे .

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com