हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी ओझरखेडा धरणात सोडण्यात यावे : खा.रक्षा खडसे

खासदार रक्षा खडसे
खासदार रक्षा खडसे

मुक्ताईनगर - Muktainagar

जळगाव (jalgaon) जिल्ह्यात सध्या चांगला पाऊस झालेला असुन त्यामुळे (Hatnoor Dam) हतनूर धरणाचे काही दरवाजे उघडण्यात येऊन त्याद्वारे जास्तीचे पाणी सोडण्यात येते, सदर जास्तीचे वाहून जाणारे पाणी आत्ताच ओझरखेडा धरणात (Ozarkheda Dam) सोडण्यात असे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे (MP Raksha Khadse) यांनी (Chief Minister Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) व माजी मंत्री आ.गिरीष महाजन (mla Girish Mahajan) यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

वरणगाव तळवेल उपसा सिंचन योजनेंतर्गत येणारे ओझरखेडा धरणाची पातळी ऑगस्ट - सप्टेंबर महिन्यात कमी होऊन शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते, सदर ओझरखेडा धरणाचे पाणी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रासाठी राखीव असल्याने सदर धरणाची पातळी कमी झाली असता, शेतकऱ्यांना पाणी मिळण्यास अडचणी येत असुन त्यामुळे खुप त्रासाला सामोरे जावे लागते. सध्या चांगला पाऊस पडत असुन हतनूर धरणातून पाणी वाहून जात आहे. जर हतनूर धरणातून वाहून जाणारे पाणी आताच ओझरखेडा धरणात सोडण्यात आले तर, पुढील काळात धरणाची पातळी चांगली राहून धरण लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पुरेशे पाणी मिळून अडचणी येणार नाहीत. असे करण देऊन खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदर मागणी केली आहे.

हतनूर धरणातून ओझरखेडा धरणात पाणी सोडणे बाबत मागील वर्षी वेळोवेळी मागणी करून सुद्धा पाणी सोडण्यात आलेले नव्हते व शेवटी सप्टेंबर महिन्यात फक्त २ दिवसासाठी सनी सोडण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना खूप त्रास झाला होता.तरी यावेळेस आत्ताच सदर पाणी सोडण्यात यावे असे खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी आपल्या पत्रात नमुद केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com