पत्नीच्या प्रियकराला धो-धो धुतले

वाद पोलीस ठाण्यात परंतु तक्रार न देता फिरले माघारी
पत्नीच्या प्रियकराला धो-धो धुतले

जळगाव jalgaon

पती (Husband) घरी नसतांना आपली पत्नी प्रियकरासोबत (Wife with boyfriend) दिसताच पतीने प्रियकराला धो- धो धुतल्याची घटना शहरात घडली. या मारहाणीत (beating) प्रियकराला 15 टाके पडले. यानंतर पती बलात्काराची तक्रार (Rape complaint) देण्यासाठी पत्नीला सोबत घेऊन पोलीस (police) ठाण्यात आला. परंतु आपसात तडजोड झाल्याने तक्रार न देता पती-पत्नी माघारी फिरले. त्यामुळे पोलिसात घटनेची कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती.

शहरातील एका भागात राहणारी 30 वर्षीय महिलेचे त्याच परिसरातील तरुणासोबत प्रेमसंबंध (Love affair) होते. हा तरुण एका रुग्णालयात कामाला असून त्याठिकाणावरूनच दोघांमध्ये जवळीकता वाढली होती. त्या महिलेचा पती घरी नसताना तरुणाचे विवाहितेच्या घरी (bride's house) येणं जाण सुरू होते. गुरुवारी पती घरी नसल्याचे या विवाहितेने प्रियकर तरुणाला कळविले. त्यानुसार तरुण दुपारी तिच्या घरी गेला आणि याच दरम्यान, त्या महिलेचा पती अचानक घरी आला. आपल्या पत्नीला (Wife) दुसर्‍याच्या मिठीत पाहताच पतीची तळपायाची आग मस्तकात गेली अन् क्षणाचाही विलंब न करता त्या प्रियकराला बेदम मारहाण (beating) करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत प्रियकर जखमी झाला असून टाके घालण्यात आले आहेत.

पत्नीला घेऊन गाठले पोलीस ठाणे

या वादानंतर पतीने पत्नीला घेऊन पोलीस (police) ठाणे गाठले. तरुणाविरुध्द बलात्काराची तक्रार देण्यासाठी पत्नीवर दबाव टाकला. त्यानंतर जखमी तरुणानेही तक्रार देण्याची तयारी केली होती.

मध्यस्थी केल्याने मिटला वाद

तक्रार देण्यासाठी आलेल्या दोघंकडील काही जणांनी वादात मध्यस्थी केली. गुन्हा दाखल झाला तर अजून बदनामी जास्त होईल, या भीतीने तो तरुण आपल्या पत्नीला घेऊन पती माघारी फिरला. त्यामुळे वादावर पडदा पडला. यामुळे या घटनेचा कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com