सर्वसामान्यांपेक्षा गुन्हेगारांवर वचक निर्माण करा!

नूतन पोलीस अधीक्षकांनी घेतली मॅरेथॉन बैठक
सर्वसामान्यांपेक्षा गुन्हेगारांवर वचक निर्माण करा!

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

प्रत्येक पोलिस अधिकार्‍याने (police officer) फिल्डवर उतरुन (Down on the field) आपले कर्तव्य बजावणे (perform duty) गरजेचे आहे. आपल्या हद्दीतील गुन्हेगारांवर वचक (Defending against criminals) ठेवतांना सर्वसामान्य नागरिक टार्गेट होणार (Citizens will not be targeted) नाही. याची काळजी देखील अधिकार्‍यांनी घेवून काम करण्याच्या सूचना नूतन पोलीस अधीक्षक एम.राजकुमार(New Superintendent of Police M. Rajkumar) यांनी गुन्हे आढावा (Crime review meeting) बैठकीत अधिकार्‍यांना दिल्या.

 पोलीस अधीक्षक एम. राजकुमार
पोलीस अधीक्षक एम. राजकुमार

जिल्हा पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक मंगळवारी सकाळी 10 वाजता पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात नूतन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या उपस्थित पार पडली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगाव विभगाचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, गृहदलाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक उपस्थित होते.

सुरुवातीला नूतन पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. त्यानंतर प्रलंबित असलेल्या गंभीर गुन्ह्यांबाबत सूचना देखील दिल्या. उपस्थितांना सूचना करतांना पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पोलिसांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी फिल्डवर उतरून काम करावे. तसेच कुठलीही कारवाई करतांना यामध्ये सर्वसामान्य नागरिकाला त्रास होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. गुन्हेगारांवर वचक निर्माण करणार सराईत गुन्हेगारांवर वचक रहाण्यासाठी पोलीस दलाकडून गेल्या वर्षभरात अनेक प्रस्ताव पाठविले आहे.

या प्रस्तांवातील काही जणांचे प्रस्ताव मंजूर झाले असून काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेल्या प्रस्तांमुळे समाजात कायदा व सुव्यवस्था बाधित होवू शकते. त्यामुळे सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईसाठी एमपीडीएच्या प्रलंबित प्रस्तांचा पाठपुरावा करण्यावर भर असल्याचे देखील पोलीस अधीक्षकांनी सांगितले. जळगाव जिल्हा हा संवेदनशील जिल्हा मानला जातो.

सण, उत्सव काळात गालबोट लागेल अशा घटनांचा इतिहास जिल्ह्याला राहीला आहे. तसेच गेल्या काही महिन्यांमध्ये खूनाच्याही घटनांनी जिल्हा हादरला आहे. जळगाव जिल्ह्यात टोळी युध्दही अनेकदा भडकले आहे. अवैध धंदे आणि वाढती गुन्हेगारी यादृष्टीने जळगावचे बिहार झाले की काय? असा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला जातो.

तत्कालीन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील संशयितांना वेळीच गजाआड करण्याची कामगिरी केली खरी. पण गुन्हेगारीचा वाढता आलेख मात्र रोखता आला नाही. जिल्ह्याला आता एम. राजकुमार यांच्या रूपाने नूतन पोलीस अधीक्षक लाभले आहे. आज त्यांनी पहिल्याच आढावा बैठकीत काही सूचक इशारे देत पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना गुन्हा नियंत्रणाचा उपदेशही दिला आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईवर भर

प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची यादी पोलिसांकडे आहे. अशा सराईत गुन्हेगारांवर वचक राहण्यासाठी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करा. जेणेकरुन त्यांच्याकडून भविष्यात दुर्घटना होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. अशी सुचना देखील नूतन पोलीस अधीक्षकांनी दिली.

सलग आठ तास मॅरेथॉन बैठक

मंगलम सभागृहात सकाळी 10 वाजता बैठकीला सुरुवात झाली. नूतन पोलीस अधीक्षकांची पहिलीच गुन्हे आढावा बैठक असल्याने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते. ही मॅरेथॉन बैठक आठ तास सुरु होती. यामध्ये पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमधील गुन्ह्यांचा आढावा घेवून अधिकार्‍यांना योग्य सूचना करुन मार्गदर्शन देखील केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com