वाहेगुरु दा खालसा वाहेगुरु दी फतेह

गुरुनानक जयंती उत्साहात; लंगरचा पाच हजार भाविकांनी घेतला लाभ
वाहेगुरु  दा  खालसा वाहेगुरु  दी फतेह

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

वाहेगुरू जी खालसा..वाहे गुरू जी की फतेह, (Waheguru Da Khalsa Waheguru Di Fateh) जो बोले सो निहाल, वाहेगुरू..असा गजर गुरूद्वारामध्ये (Gurdwara) झाला. शिख समाजाचे (Sikh community) धर्मगुरू गुरूनानक साहेब (Guru Nanak Saheb Jayanti) यांची जयंती मंगळवारी उत्साहात (Celebrate with enthusiasm) साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिख बांधवांची उपस्थिती होती.

शिख समाजाचे धर्मगुरू गुरुनानक साहेब यांची जयंती येथील गुरुद्वारा प्रबंधक शिख समितीतर्फे मोठ्या जल्लोषात जिल्हा रुग्गाणालयामागील गुरूद्वारात साजरी करण्यात आली. गुरुद्वारावर आकर्षक विद्युत रोषणाई करून फुलांनी गुरुद्वाराला सजविण्यात आले होते. सकाळी आठपासून निशानसाहेब यांची सेवा सुरू झाली. यात अनेक भाविक सहभागी झाले होते. तर दहा वाजता अखंड पाठाची समाप्ती झाली. सकाळी अकरापासून कीर्तन व लंगर (महाप्रसाद) कार्यक्रम घेण्यात आला. पाच हजार समाजबांधव यावेळी उपस्थित होते.

वाहेगुरु  दा  खालसा वाहेगुरु  दी फतेह
महापौर जयश्री महाजनांकडून जळगावकरांची दिशाभूल

रात्री एक वाजता आरती

गुरूनानक जयंतीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम झाल्यानंतर रात्री एक वाजून 20 मिनिटांनी जन्म उत्सव निमित्त गुरूनानक साहेब यांची आरती करून तसेच फटाके फोडून जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

वाहेगुरु  दा  खालसा वाहेगुरु  दी फतेह
श्री मंगळ ग्रह मंदिरात झाला तुळशी चा शाही विवाह महासोहळा

लगंरचा अनेकांनी घेतला लाभ

सकाळी अकरा वाजेपासून लंगरचा (महाप्रसाद) कार्यक्रम गुरूद्वारा येथे सुरू झाला. यावेळी शिख समाज बांधवाांसह अन्य नागरिकांनी देखील या लंगरचा लाभ घेतला. यावेळी गुरुद्वारा प्रबंधक शिख समितीचे पदाधिकारी, सदस्य तसेच समाजबांधवांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम केले.

वाहेगुरु  दा  खालसा वाहेगुरु  दी फतेह
Visual Story # क्रितीचा ‘ठुमकेश्वरी’ अंदाज पाहिलात का?
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com