वाघूर पाणीपुरवठा योजना ; कार्यारंभाचे आदेश मिळाल्याने आनंद

वाघूर पाणीपुरवठा योजना ; कार्यारंभाचे आदेश मिळाल्याने आनंद

लोहारा ता.पाचोरा - वार्ताहर pachora

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्र ना.गुलाबराव पाटील (Guardian Minister Gulabrao Patil) यांच्या आदेशान्वये वाघूर धरणावरून (Waghur Dam) लोहाऱ्यासाठी जल जीवन मिशन योजने (Jal Jeevan Mission) अंतर्गत पाणी पुरवठा योजनेला (Water Supply Scheme) कार्यारंभाचे आदेश मिळाल्याची माहिती लोहाऱ्याचे सरपंच अक्षयकुमार जयस्वाल यांनी दि.३१ ऑक्टोबर रोजी सकाळी उपस्थित पत्रकारांना दिली व सदर योजना पूर्ण झाल्यावर गावाचा पुढील पन्नास वर्षांचा पाणी प्रश्न संपुष्टात येईल असे सांगितले.

वाघूर पाणीपुरवठा योजना ; कार्यारंभाचे आदेश मिळाल्याने आनंद
Visual Story प्राजक्ताच्या या हटके फोटोशूटने केले घायाळ...

सदर बातमी लोहाऱ्यातील नागरिकांना समजताच लोहाऱ्यातील नागरिकां आनंद व्यक्त केला. सरपंच अक्षय जयस्वाल व त्यांच्या सर्व सहकाऱयांनी पाणी पुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे आभार मानले.

लोहारे गावाची प्रमुख पाणी पुरवठा योजना राणीचे बांबरुड येथून असून म्हसास धारणा वर पूरक पाणी पुरवठा योजना आहे,या दोन्ही धरणांच्या क्षेत्रात कमी प्रमाणात पाऊस पडल्यास धरणं भरत नाहीत व त्याचा गावातील पाणी पुरवठ्यावर विपरीत परिणाम होत असे भविष्यात गावाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता गावातील नेते त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या पक्ष श्रेष्टींकडे वाघूरची पाणी पुरवठा योजना मिळावी अशी मागणी करत आले व त्याला यशही आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com