Photo # पाचोरा येथे अवतरले काशीचे विश्वेश्वरनाथ मंदिर

उत्तर महाराष्ट्रातील एकमेव देखावा, भाविकांना होतेय विश्वेश्वरनाथांच्या दर्शनाची अनुभूती
Photo # पाचोरा येथे अवतरले काशीचे विश्वेश्वरनाथ मंदिर

लक्ष्मण सुर्यवंशी

पाचोरा - pachora

येथे यंदाच्या गणेशोत्सवात मोक्षभूमी असलेल्या काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची (Visveshwarnath Temple) प्रतिकृती साकारली असून बंगाली कारागिरांच्या अथक परिश्रमातून आमदार किशोर पाटील (MLA Kishore Patil) यांचे पुत्र युवा नेते सुमित पाटील यांच्या निर्धारात्मक कल्पकतेतून ही आरास साकारण्यात आल्याने भाविकांना खऱ्या अर्थाने येथे दर्शन घेऊन काशी केल्याचे आत्मिक समाधान लाभणार असल्याने भाविकांचे आकर्षण वाढले आहे.

मानसिंगका मिलच्या (Mansingka Mill) प्रांगणात आमदार किशोर पाटील यांच्या प्रेरणेने सुमित पाटील यांनी काशीच्या विश्वेश्वरनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याचा निर्णय घेतला त्यासाठी बंगाली कारागिरांची मदत घेण्यात आली. गेल्या दीड महिन्यांपासून सुरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली वीस बंगाली कारागरांच्या चमूने या जगप्रसिद्ध मंदिराची प्रतिकृती साकारली.

देशातील प्रत्येक नागरिकाला काशी या पुण्यभुमीतील तीर्थक्षेत्रास जावेसे वाटते. काशी केल्याने जीवनात मोक्ष मिळतो अशी धार्मिक श्रद्धा असल्याने परंतु अनेकांना आर्थिक अथवा इतर कारणांमुळे काशी जाणे शक्य होत नाही त्यामुळे आपणच पांडव व भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पाचोरा पुण्यभूमीत काशीच्या विश्वेश्वर नाथांच्या मंदिराची प्रतिकृती साकारावी या निर्धारात्मक संकल्पनेतून सुमित पाटील यांनी हा उपक्रम येथे राबवला आहे.

सुमित पाटील यांनी या उपक्रमाच्या माध्यमातुन आपले कौटुंबिक, धार्मिक व सांस्कृतिक संस्कार वृद्धिंगत केले आहेत. अंतुर्ली येथील पाटील कुटुंबीय गेल्या तीन पिढ्यांपासून विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

याच कुटुंबातील सुमित पाटील यांनी आपला हा कौटुंबिक वारसा वृद्धिंगत करण्याच्या हेतूने पाचोरा येथे काशीच्या विश्वेश्वरनाथ मंदिराची प्रतिकृती साकारण्याच्या विचारास मूर्त रूप दिले आहे.

मुंबई (mumbai) व्यतिरिक्त असा विश्वेश्वर मंदिराचा भव्य देखावा उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) साकारण्यात आलेला नाही. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांना काशी येथील विश्वेश्वरनाथांच्या दर्शनाची अनुभूती व्हावी व त्यांनाही आपण काशी करून मोक्ष मिळवण्याचा आनंद व्हावा व त्यांची काशी केल्याची इच्छा पूर्ण व्हावी या हेतून मंदिराची प्रतिकृती साकारली असून हजारो भाविकांना या निमित्ताने काशीचे दर्शन घडविण्याचे भाग्य मिळाल्याचा आनंद असल्याचे सुमित पाटील यांनी स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात दिवसभर हे मंदिर दर्शनासाठी खुले राहील भाविक महिला पुरुषांच्या दर्शनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून ज्या मानसिंगका मिलचा गणपती परिसरात प्रसिद्ध मानला जात होता त्याच ठिकाणी या मंदिराची प्रतिकृती साकारून हा धार्मिक ठेवा कायम ठेवला असल्याचे स्पष्ट केले. भाविकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन सुमित पाटील, समाधान पाटील यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com