
चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी
राष्ट्रीय शिक्षण प्र. मंडळाची निवणडुक नुकतीच जिल्ह्यात गाजली. नवनियुक्त संचालकांची आज(दि,२०) पदाधिकार्यांच्या नियुक्तीसाठी पहिला बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते अध्यक्षपदी डॉ.विनयाक चव्हाण, सचिवपदी प्रा.बाळासाहेब चव्हाण यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी पुष्पा भोसले यांची निवड करण्यात आली.
तसेच सहसचिवपदी रावसाहेब सांळुखे यांची निवड झाल्याची माहिती मिळाली आहे. निवडीनतंर नुतन पदाधिकार्यांचे शैक्षणिक क्षेत्रातून अभिनदंन केले जात आहे. आता नवनियुक्त पदाधिकार्यांवर संस्थेचा कारभार पारदर्शक चालविण्याची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षात संस्थेचा विकास कशा प्रकारे साधला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.