आसोदा पुलाच्या कामासाठी 8 गावातील ग्रामस्थांचे उपोषण

आसोदा पुलाच्या कामासाठी 8 गावातील ग्रामस्थांचे उपोषण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

आसोदा-यावल राज्यमार्गावरील (Asoda-Yaval State Highway) आसोद्याजवळील रखडलेल्या पुलासाठी (lagging bridges) सोमवारी ग्रामस्थांनी (Villagers) उपोषण (hunger strike) सुरु केले. ग्रामस्थ आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष मोजणी केली. आसोदा पुलाचे काम पोलिस बंदोबस्तात तात्काळ सुरु करीत मंजूर आराखड्यानुसारच पुढील काम पूर्ण करण्याचे आश्वासन (Assurance) दिले.तसेच कामात अडथळे ठरणारे अतिक्रमण काढण्याचेही आश्वासन अधिकारी- कंत्राटदारांनी दिल्याने आठ गावातील ग्रामसंयोजन समिती व ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी सुरु केलेले उपोषण दुपारी मागे घेण्यात आले.

आसोदा पुलाची रूंदी (width of the bridge) ही निश्चित आराखड्यानुसार न घेतल्याने या कामावर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने (Public Works Department) दीड महिन्याभरापासून हे काम बंद केले आहे. याबाबत ग्रामस्थांनी विभागाकडे वारंवार तक्रार करूनही काम सुरु करण्यात येत नसल्याने 8 गावातील ग्रामस्थांनी उपोषण (hunger strike) केले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत येडाईत (Executive Engineer Prashant Yedai), शाखा अभियंता सुभाष राऊत, अभियंता अभिषेक सूर्यवंशी, कंत्राटदार मिलींद अग्रवाल यांनी पुलावर येवून ग्रामस्थांच्या मागण्यांसंदर्भात चर्च करुन निरसन करण्यात आले. बांधकाम झालेल्या पुलाच्या मोजणीसह उर्वरित कामाचे नियोजन व आराखड्याची मांडणीही यावेळी केली.

पुलाचे काम तात्काळ सुरु करण्यासह अडथळे ठरणारे अतिक्रमण (Encroachment) काढून निश्चित आराखड्यानुसारच काम पूर्ण करण्याचे आश्वासन अभियंता, कंत्राटदारांनी दिल्याने ग्रामस्थांने हे उपोषण मागे घेतले. मात्र नियोजनानुसार काम न झाल्यास पुन्हा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला.

या आंदोलनात समितीचे किशोर चौधरी, खेमचंद महाजन, रवी देशमुख, तुषार महाजन, दिलीप कोळी, विजय नारखेडे, सुनील पाटील, सुभाष महाजन, उमेश बाविस्कर, अनिल महाजन, संजीव पाटील, सुरेश वाणी, शरद नारखेडे, जितेंद्र भोळे, रतीलाल खंबायत, संजय चिरमाडे, ज्ञानेश्वर चौधरी, रवींद्र कोल्हे, सुभाष नेहते, हेमंत पाटील यांचा समावेश होता.

Related Stories

No stories found.