
जळगाव - jalgaon
‘एकच मिशन जुनी पेन्शन’ (Pension) या महत्व पूर्ण विषयावर सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ध्येय वेडे, संवर्ग हिता साठी स्वतःचे कुटूंब सोडून इतरांसाठी काही तरी करण्याची जिद्द व इतरांना प्रेरणा देणारे व्यक्तीमत्व वाशीम (Washim) जिल्ह्यातील ग्रामसेवक संजय बेदरे हे सायकलने (bicycle) दिवस रात्र प्रवास करीत आहे.
प्रत्येक तालुक्यात त्यांचे उत्साहात स्वागत होत आहे. ते या विषयी आपले राज्य अध्यक्ष संजीव निकम यांना निवेदन देण्यासाठी सायकलने निघालेले आहे. त्यांचे आगमन जळगाव येथे झाले असता त्यांचे स्वागत जिल्हा अध्यक्ष नंदकुमार गोराडे आप्पा यांनी जिल्हा परिषद समोर केले.
याप्रसंगी रमेश पवार जिल्हा कायदे सल्लागार, गिरीष चव्हाण माजी सचिव जळगाव, विकास पाटील, जिल्हा संघटक, बी.पी.पाटील संचालक पारोळा, माजी सचिव पाचोरा सतिश सत्रे, दत्तू इंगळे, गजानन चव्हाण, आर.डी.खर्चे, शेख भाऊसाहेब, दिगंबर पाटील सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.