
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
पोस्कोच्या गुन्ह्यातील (POSCO crime) तक्रार मागे घे (withdraw complaint)म्हणत पीडितेच्या कुटुंबियांना (Victim's family) लोखंडी रॉडने मारहाण (beaten with iron rod) करीत त्यांच्या वाहनाचे (vehicle) नुकसान (damage) केल्याची घटना दि. 15 मे रोजी घडली होती. याप्रकरणी सहा महिन्यानंतर शनिपेठ पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका भागात राहणार्या महिलेने पोलिसात पोस्कोतंर्गत तक्रार केली होती. याप्रकरणी न्यायालयात खटला सुरु असून ही तक्रार मागे घेण्यासाठी संशयित तेजस दिलीप सोनवणे याच्यासह त्याची आई ममता दिलीप सोनवणे, वडील दिलीप विश्वनाथ सोनवणे व मानलेली बहिण पुनम आनंदा सपकाळे हे त्यांच्या घराजवळ गेले. तसेच महिलेला कोर्टात चालू असलेली पोस्कोची केस मागे घे नाही तर तुम्हाला जीवेठार मारु अशी धमकी देवून त्या महिलेच्या कुटुंबियांना लोखंडी रॉडने मारहाण केली.
यामध्ये महिलेला दुखापत होवून त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले होते. दरम्यान, जखमी महिलेला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी पोलिसांनी जखमीचा जबाब घेतला होता. दरम्यान, महिलेवर सुरु असलेल्या उपचाराचे सर्टीफिकेट दि. 1 डिसेंबर रोजी प्राप्त झाल्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली.
त्यानुसार संशयित तेजस दिलीप सोनवणे, ममता दिलीप सोनवणे, पुनम आनंद सपकाळे, दिलीप विश्वनाथ सपकाळे सर्व रा. पार्वताबाई ओक नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.