
जळगाव jalgaon । प्रतिनिधी
जिल्हा परिषद (Zilla Parishad) पदाधिकार्यांसह सदस्यांचा कार्यकाळ (Tenure) 20 मार्च रोजी संपला असल्याने राजकीय राजवटही संपुष्टात आली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका (Elections) लांबणीवर पडल्याने शासनाच्या आदेशानुसार सोमवारी जि.प.सीईओ डॉ.पंकज आशिया (CEO Dr. Pankaj Asia) यांनी जि.प.च्या प्रशासक (administrator) पदाची सूत्रे स्वीकारली आहे. सीईओंनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व विभागप्रमुखांची आढावा बैठक घेऊन त्यांना कामकाजाविषयी सूचना दिल्या. तसेच जि. प.अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार सभापतींची वाहने (Vehicles) जि.प.प्रशासनाकडे जमा करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील 15 पंचायत समित्यांवर (Panchayat Samiti) यापूर्वीच प्रशासक (administrator) म्हणून बीडिओंकडे पदभार आला आहे. पंचायत समित्यांपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या पदाधिकार्यांसह सदस्यांचा (Members with office bearers) पाच वर्षांचा कार्यकाळ 20 मार्च रोजी संपुष्टात आला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या गट, गणाच्या प्रारूप आराखडा रचनादेखील जि.प.प्रशासनाकडून राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला होता.
मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) निवडणुका (Elections) घेण्यात येऊ नयेत, यामागणीवरून राज्य सरकारने (State Government) ओबीसी आरक्षणाच्या नव्याने अध्यादेश पारित केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात सर्वच प्रारूप आराखडा रचना रद्द करण्यात आली आहे.
तसेच जिल्हा परिषदेचा 21 मार्च 2017 ते 20 मार्च 2022 या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यकाळ 20 मार्च रोजी संपुष्टात आला आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Elections) सहा महिने लांबणीवर पडल्या असल्याने 21 मार्च रोजी जिल्हा परिषदेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले असून प्रशासक पदाची (administrator) सूत्रे सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी आज स्वीकारली आहे. त्यामुळे जि.प.अध्यक्ष रंजना पाटील,(ZP President) उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्यासह चार सभापतींनी शासकीय वाहने (Vehicles) जिल्हा परिषद प्रशासनाकडे जमा केली आहे.