गाय-वासरांच्या पूजनाने वसुबारस उत्साहात

आज धनत्रयोदशी, दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ गजबजली
गाय-वासरांच्या पूजनाने वसुबारस उत्साहात

जळगाव । jalgaon प्रतिनिधी

दिपोत्सवाला (Dipotswala) आज पासून सुरुवात झाली. त्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत (market) प्रचंड गर्दी होत असल्याने बाजारात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच सोमवारी वसू बारस (Vasubaras) असल्याने शहरातील विविध भागांसह गो-शाळांमध्ये गाय व वासरांचे पुजन (cow-calf worship) करण्यात आले.

सर्व सणांमध्ये महत्वाचा मानला जाणारा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला असतो. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्याने हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. मात्र यंदा कोरोनाचे सावट मंदावले असल्याने प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधात शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले आहे. यंदा दिवाळी महिन्याच्या सुरुवातीलाच आल्याने अनेकांना बोनस देखील मिळाला नसल्याने प्रत्येकाला खरेदी करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

तसेच आज पासून दिपोत्सवाला सुरुवात झाल्याने बाजारपेठेत सकाळपासून दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. तसेच नागरिकांकडून केरसूरणी, लक्ष्मीची मुर्तीसह, दिवाळीला फराळासाठी लागणारे साहित्य खरेदी केली जात आहे. तसेच कपड्यांच्या दुकानात देखील प्रचंड गर्दी होत असल्याने दीड वर्षानंतर बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून आले.

कपड्यांच्या दुकानांत प्रचंड गर्दी

दिवाळीला प्रत्येक जण नवीन कपड्यांची खरेदी करीत असतो. दरम्यान गेल्यावर्षी दिवाळी अत्यंत साधेपणाने साजरी केल्याने यंदा दिवाळीची खरेदी करण्यासठी लहानग्यांपासून ते मोठ्यापर्यंत प्रत्येक जण कपड्यांची खरेदी करीत आहे. त्यामुळे शहरातील कपड्यांच्या दुकानात खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत बाजारपेठ गजबजलेल्या दिसून आल्या.

आज धनत्रयोदशी

दिपोत्सावातील दुसरा महत्वाचा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरातील धन-धान्यासह राशींचे पुजन करुन घरात सदैव लक्ष्मीचा सहवास असो यासाठी धनत्रयोदशीला देवतांचे मनोभावे पुजन केले जात असते. या दिवशी अनेक जण सोने खरेदीचा मुहूर्त साधत असल्याने शहरातील सराफी पेढ्यांमध्ये विविध प्रकारचे ऑफर्स दिल्या जात असल्याने याठिकाणी नागरिकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com