दोन वर्षानंतर होणार वर्सी महोत्सव

13 पासून महोत्सवाला सुरुवात; देशविदेशातील भाविक येणार
 दोन वर्षानंतर होणार वर्सी महोत्सव

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

येथील अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट (Amar Shahid Sant Kanvarram Trust) आणि पूज्य संत कंवरनगर सिंधी पंचायंत (Pujya Sant Kanwarnagar Sindhi Panchayanta) यांच्यातर्फे वर्सी महोत्सव (Varsi Festival) आयोजित केला आहे. पूज्य श्री अमर शहीद संत कवरराम साहब (Pujya Shri Amar Shaheed Sant Kavarram Sahab)यांचा (65) वा,पूज्य सतगुरू श्री संत बाबा हरदासराम साहब (Reverend Satguru Shri Sant Baba Hardasram Sahab) यांचा (45) वा तर बाबा गेलाराम साहेब (Baba Gelaram sir) यांचा (14) वा वर्सी महोत्सव (Varsi Festival) 13 ते 16 ऑक्टोंबर दरम्यान होणार आहे.

जळगाव येथे येथे दरवर्षा प्रमाणे कंवरराम नगरात वर्सी महोत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जाते. परंतू कोरोना महामारीमूळे गेल्या दोन वर्षापासून वर्सी महोत्सव पूजा व आरती करून साध्या पद्दतीने साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने प्रशासनाकडून सर्व प्रतिबंध उठविल्याने यंदा अमर शहिद संत कंवरराम ट्रस्ट आणि पूज्य संत कंवरनगर सिंधी पंचायंत यांच्यातर्फे वर्सी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

यासाठी संत कंवरारम नगरात विशेष तयारी गेल्या महिना भरपासून केली जात आहे. ही तयारी अंतिम टप्यात आली असून यंदा भव्य नविन इमारतीत दर्शनासाठी विषेश व्यवस्था, महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था, आकर्षक विद्यूत रोषणाई, मोठ्या प्रमाणात येणारे भाविकांसाठी राहणे, भोजन व्यवस्था केली जाणार आहे.

यासाठी गेल्या महिन्याभरापासून अमर शहिद संत कंवरराम ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद विसरवानी, सेक्रेटरी राम कटारिया, जॉईंट सेक्रेटरी अशोक मंधान, कॅशियर जगदीश कुकरिया, रमेश मत्तानी, नगरसेवक भगत बालानी, राजूभाई प्रज्ञानी, विजयकुमार दारा, शंकरलाल लखनानी, संतीष पंजाबी, वरुण रावलानी, बनाराम शामदानी आदी सदस्य, सेवेकरी व सिंधी बांधवातर्फे परिश्रम केले जात आहे.

वर्सी महोत्सवात देशभरातून तसेच परदेशातून सिंधी समाजाचे संत महात्मा व सिंधी समाजबांधव येत असतात. पल्लव पं. साई राजेशकुमार साहब यांच्या उपस्थित हा वर्सी महोत्सव होणार असून बुधवार 13 रोजी सकाळी 5 वाजता देवरी साहेब पंचामृत स्नान, गुरूग्रंथ साहब व धुनि साहब अंखड पाठने वर्सी महोत्सवाला सुरूवात होईल.

तसेच सकाळी 9 ते 11 या वेळेत विश्व शांती यज्ञ होईल. 15 रोजी सकाळी 11 वाजता झेंडा पूजन, गुरूग्रंथ साहब व धुनि साहब अंखड पाठचा भोग साहब होणार आहे. तर रविवार 16 रोजी वरसी साहब का पल्लव कार्यक्रमाने वर्सी महोत्सवाची सांगता होईल.

नविन वास्तूमध्ये विशेष सुविधा

संत कंवरराम नगरातील नविन मंदिराच्या वास्तू मध्ये भाविकासांठी दर्शनासाठी एलईडी टिव्ही लावले जाणार आहे. तसेच चार ते पाच ठिकाणी मोठ्या कमानी, महिलासांठी दर्शनासाठी स्वतंत्र्य व्यवस्था केली जाणार आहे.

वर्सी महोत्सवात येणारे संत व कार्यक्रम

बिशनी ईसरानी (गांधी धाम), संत बाबाहरदासराम पटापट टोली, झुलेलाल म्युझिकल पार्टी (बहराणा साहब, उल्हासनगर), साई राजेशलाल (राम श्याम पार्टी, अमरावती), गौरव नाथानी (रिध्दी-सिध्दी डान्स गृप), बाबा हरदासराम म्युझिकल पार्टी (रतन जाधवानी, जळगाव), मखण म्युझिक पार्टी (लखनऊ), अनिल भगत (उल्हासनगर), बाबल प्यारो जळगाव वारो गृप, यार कंवर दिलदार कंवर भव्य नासिक, दशेश्वर जागरण पार्टी (हरिद्वार)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com