शाळा सुरु होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे लसीकरण

‘हर घर दस्तक’ अभियानांतर्गत 12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्यांना डोस
शाळा सुरु होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे लसीकरण

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

कोरोनाची (Corona) आतापर्यंत तीन लाटा येऊन गेल्या आहेत. आता चौथी लाट मुंबई,पुण्याच्या उंबट्यावर असल्याने जळगाव जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात येऊन शाळा सुरु (start of school) होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचे (students) घरोघरी आणि शाळास्तरावर लसीकरण (Vaccination) मोहीम 1 जूनपासून राबविण्यात आली आहे. 60 टक्के शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 40 टक्के विद्यार्थ्यांसाठी हर घर दस्तक अभियानांतर्गत (Every house knocking campaigns) 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांना डोस दिला जाणार आहे.

जिल्ह्यात शाळा सुरू होण्यास अजून 5 दिवस शिल्लक असल्यामुळे वाट न बघताच हर घर दस्तक अभियानांतर्गत 12 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) करणार केले जाणार आहे. कारण शहरासह जिल्ह्यात 12 ते 14 या वयोगटातील लाभार्थ्यांनी कॉर्बिव्हॅक्स लसीचा (Corbivax vaccine) पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत 60 टक्के विद्यार्थ्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. त्यातही दुसरा डोस घेणार्‍यांची टक्केवारी फक्त चौदाच आहे. ते बघता जिल्हा परिषद आरोग्य विभागाने (Zilla Parishad Health Department) टक्केवारी वाढवण्यासाठी कंबर कसली असून यापुढे ग्रामीण भागात घरोघरी जाऊन लस दिली जाणार आहे.

आतापर्यंत घराजवळ शिबिरांचे आयोजन करून लस दिली जात होती. 15 ते 18 वयोगटातील युवकांची लस घेण्याची टक्केवारी 59 टक्के राहिली आहे. त्यामुळे या दोन्ही वयोगटातील विद्यार्थ्यांना लस घेण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे. त्यांच्या पालकांनाही लसीचे दुष्परिणाम नसल्याचे सांगितले जाणार आहे. कारण सध्या चौथ्या लाटेचा धोका आहे. तत्पूर्वी जेवढ्या जास्त विद्यार्थ्यांचे लसीकरण (Vaccination) होईल,तेवढे पूर्ण करायचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com