ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची सभा
ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव : Jalgaon

प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक (Senior citizen) महत्वाचे सदस्य आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुदृढ स्वास्थासाठी येत्या ज्येष्ठ नागरिक दिनी अर्थात 1 ऑक्टोबर, 2021 रोजी ज्येष्ठ नागरिकांचे (Covid-19 vaccination) कोविड-19 लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी दिल्या.

ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत
तृतीयपंथीयांना मिळणार ओळखपत्र ; पोर्टलवर नाव नोंदणीचे आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयात ज्येष्ठ नागरिक समन्वय व सनियंत्रण समितीची सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे (Chief Executive Officer Dr. Pankaj Asia) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, (Superintendent of Police Dr. Praveen Munde) पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भीमाशंकर जमादार (District Health Officer Dr. Bhimashankar Jamadar), जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी सांगितले, ज्येष्ठ नागरिक कुटुंबासाठी आधार असतात. त्यांच्या अनुभवाचा कुटुंबीयांनी लाभ घेतला पाहिजे. तसेच ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन करावे. या दिवशी जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांनी कोविड–19 चे लसीकरण करून घ्यावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री.राऊत यांनी केले.

समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.पाटील यांनी ज्येष्ठ नागरिक अधिनियमाविषयीची माहिती बैठकीत दिली.

ज्येष्ठ नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करा-जिल्हाधिकारी अभिजित राऊत
गिरणा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा

Related Stories

No stories found.