नॅनो युरियाच्या वापरामुळे सबसिडीवरील आर्थिक भार कमी - शरद महाजन

नॅनो युरियाच्या वापरामुळे सबसिडीवरील आर्थिक भार  कमी  - शरद महाजन

न्हावी, Nahvi ता यावल वार्ताहर-

नॅनो युरियाचा (Nano urea) वापर करण्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणा सोबतच सरकारच्या सबसिडीवर (subsidy) पडणारा आर्थिक भार (Financial burden) कमी होईल तरी शेतकर्‍यांनी नॅनो युरिया चा वापर शेतीसाठी (Agriculture) करावा असे प्रतिपादन जिवराम तुकाराम महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीचे (Jivaram Tukaram Mahajan Fruitsell Co-operative Society) चेअरमन शरद महाजन (Chairman Sharad Mahajan) यांनी केले. ते नॅनो युरिया कँपेनिंग व्हॅनच्या शुभारंभप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते .

शरद महाजन यांच्या हस्ते व्हॅनचे पूजन करण्यात आले व व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.

तत्पूर्वी शेतकऱ्यांना नॅनो युरियाचे महत्त्व इफको कंपनीचे क्षेत्रीय प्रबंधक एस व्ही पाटील यांनी पटवून दिले, आणि शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.

यावेळी अक्षय महाजन, जे टी महाजन फ्रुटसेल सहकारी सोसायटीचे संचालक भोजराज बोरोले, ज्ञानदेव चोपडे ,किशोर तळेले, सुजय महाजन, राजेंद्र भारंबे, महेंद्र पाटील ,ज्येष्ठ सभासद रामा पाचपांडे, न्हावीचे गट कृषी अधिकारी प्रकाश चौधरी, शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन पी एच महाजन, सेक्रेटरी हर्षद महाजन, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रवीण वारके, दूध उत्पादक सहकारी संस्थेचे व्हाईस चेअरमन पराग वाघुळदे, यांच्यासह प्रा डॉ के जी पाटील, सुहास ट्रेडर्सचे निळकंठ भंगाळे, शरद ठोंबरे, रवींद्र झोपे ,अरुण झोपे, दीपक बोरोले, निलेश चौधरी ,जनार्दन पाटील, प्रशांत फेगडे, दत्तू पाटील ,वासुदेव इंगळे, मधुकर चोपडे यांच्यासह गावासह परिसरातील शेतकरी बांधव उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मॅनेजर किरण पाटील यांनी मानले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com