अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत!

मंत्री गिरीश महाजन यांचे आश्वासन; डबल इंजिनच्या सरकारमध्ये दुपटीने होणार विकास
अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना तातडीची मदत!

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Govt) काळात राज्याचा विकास (development) खुंटला (state was stunted) आहे. राज्यात सिंचन, रस्ते, वीज, शेतकर्‍यांचे प्रश्न अशा विविध समस्या (Various problems) आहे. सोबतच अतिवृष्टीग्रस्त (Heavy rains) शेतकर्‍यांना मदत (Help to farmers) करण्यास प्राधान्य राहणार असल्याचा आशावाद मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच आज शुक्रवारी सकाळी जळगाव येथे ना.गिरीश महाजन यांचे रेल्वेने आगमन झाले. यावेळी ना.महाजन यांचे ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर शिवतीर्थ मैदानावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालादेखील पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ना. महाजन म्हणाले की, युती सरकारमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे दमदार नेतृत्व असून सोबतच केंद्रातील भाजप सरकारमुळे डबल इंजिन राहणार असल्याने विकासाचा वेग दुपटीने होणार असल्याचा विश्वास ना. महाजन यांनी व्यक्त केला. तसेच राज्यातील रखडलेली कामे वेगाने करण्यावर भर राहणार असल्याचे ते म्हणाले.

माजी मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्ते तर दूरच मंत्री, आमदारांच्यादेखील त्यांनी भेटी घेतल्या नाही व केवळ ऑनलाइन कामकाज चालविले. त्यामुळे राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असे म्हणत महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेल्या विषयांवर ना. महाजन यांनी टीका केली.

ते चित्रा वाघ यांचे वैयक्तिक मत

संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राठोड यांच्यावर टीका केली होती. यावर बोलतांना ना. महाजन म्हणाले की, मंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारने राठोड यांना क्लीन चिट दिली असून त्यांनीच क्लीनपीठ द्यायची व आता मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्यावर टीका करायची हे योग्य नाही. तसेच चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्यावर केलेल्या टिकेविषयी ते वाघ यांचे वैयक्तिक मत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

पालकमंत्री पदाची धुरा ना. गुलाबरावांकडेच!

स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शासकीय ध्वजारोहण नेमके कोणाच्याहस्ते होणार या विषयावर बोलतांना ना. महाजन म्हणाले की, जळगाव येथे ध्वाजारोहन ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते तर नाशिक येथे माझ्याहस्ते होणार आहे. त्यामुळे ध्वजारोहणाचा बहुमान हा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना मिळत असल्याने त्यामुळे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री पद ना. गुलाबराव पाटील यांनाच मिळणार असल्याचे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.

पंकजा मुंडेंना मिळणार मोठे पद

मंत्री मंडळाच्या विस्तराला दिरंगाई झाली हे मान्य आहे. मात्र अजून 23 मंत्र्यांचा शपथविधी अजून बाकी आहे. त्यामुळे पंकजा मुंडे या नाराज असल्याचा प्रश्नच येत नाही. कदाचित त्यांना मोठे पद देखील दिले जावू शकते. तसेच आमदारांमध्ये थोडीफार नाराजी असतेच. मात्र त्यांची नाराजी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे ना. महाजन हे यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com