Update Breaking news : ग.स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती : सत्ता स्थापनेसाठी होणार पळवापळवी

सहकार गट 9 , लोकसहकार गट 6, प्रगती शिक्षक सेना गट 6 जागांवर विजयी
Update Breaking news : ग.स. सोसायटीत त्रिशंकू स्थिती :  सत्ता स्थापनेसाठी होणार पळवापळवी

जळगाव jalgaon प्रतिनिधी -

ग.स.सोसायटीच्या (Co-operative Credit Bureau of District Government Servants) चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत (Elections) धक्कादायक निकाल (Shocking results) समोर आला आहे. या निवडणुकीत दिग्गजांना पराभवाचा फटका बसला असून काही दिग्गजांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे. या निवडणुकीत सहकार गटाला (Sahakar) नऊ तर लोकसहकार गटाला (Lok Sahakar) 6 आणि प्रगती शिक्षक सेनेला (Pragati Shikshak Sena) 6 जागांवर विजय (Won) मिळाला आहे.

तर लोकमान्य गट,स्वराज्य पॅनल, अपक्ष उमेदवारांचा सुपडा साफ झाला आहे. ग.स. मध्ये त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने घोडेबाजाराला ऊत येणार आहे. ग.स.वर कोणाचा झेंडा फडकणार याकडे आता लक्ष लागले आहे.

ग.स. सोसायटीच्या निवडणुकीत 21 जागांसाठी 115 उमेदवार रिंगणात होते.पहाटे पाच वाजेपर्यंत मतमोजणी सुरू होती. या नुसार मतदारसंघ निहाय उमेदवारांना मिळालेली मते अशी

बाहेरील मतदारसंघ

यात बाहेरील मतदारसंघातून अजय सोमवंशी 64 95 मते, महेश पाटील 6105 मते, रविंद्र सोनवणे 5999, भाईदास पाटील 5882, ज्ञानेश्वर सोनवणे 5882मते, योगेश इंगळे 5825 मते, अनिल गायकवाड पाटील 5716मते, अजय देशमुख 5602मते, विश्वास पाटील 5444 मते, निलेश पाटील 5382मते, मंगेश भोईटे 5242 मते मिळवून विजयी झाले आहेत. या मतदारसंघात वैद्य मते 23775 तर अवैध मते 1612 झाली आहेत.

स्थानिक मतदार संघ

स्थानिक मतदार संघातून उदय पाटील 8243 मते, योगेश सनेर 6961 मते, सुनील सूर्यवंशी 6934 मते, अजबसिंग पाटील 6608 मते, मनोज माळी 6466 मते मिळवून विजयी झाले आहेत.

या मतदार संघात वैध मते 24381 तर अवैध मते 1006 आहेत.

महिला राखीव मतदार संघ

महिला राखीव मतदार संघात प्रतिभा सुर्वे 8740 मते, रागिणी चव्हाण 5953 मते मिळवून विजयी झाले आहेत. यात अवैध मते 2490 तर 797 अवैध मते झाली आहेत.

इतर मागास वर्ग मतदार संघ

इतर मागास वर्ग मतदार संघातून रावसाहेब पाटील 10244 मते मिळून विजय झाले आहेत.प्रतिस्पर्धी विलास नेरकर यांचा पराभव केला आहे. वैध मते 24401 तर 986 मते बाद झाली आहेत.

अनुसूचित जाती, जमाती मतदार संघ

अनुसूचित जाती, जमाती मतदार संघातून विजय पवार यांना 8322 मते मिळवून विजयी झाले आहेत. या मतदार संघात वैध मते 24369 तर 1018 मते बाद झाली आहेत.

विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गट

विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग गटातून अमरसिंग पवार 58151 मतांनी विजयी झाले आहेत. या मतदारसंघात वैध मते 23845 तर 1542 बाद झाली आहेत.

हे दिग्गज पराभूत

या निवडणुकीत दिग्गज पराभूत झाले असून यात माजी संचालक विलास नेरकर, एन.एस. पाटील, सुनील अमृत पाटील, सुनील निंबा पाटील, कल्पना पाटील, यशवंत सपकाळे, अनिल सुरडकर, सुभाष जाधव तर स्वराज्य पॅनल प्रमुख आर.के.पाटील यांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.