भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेटमध्ये रणगाड्याचे अनावरण

पाकिस्थानच्या युद्धात महत्वपूर्ण योगदान : नागरिकांना पाहण्यासाठी खुला
भुसावळ आयुध निर्मानित ठेवण्यात आलेला टी-५५ टँक (रणगाडा)
भुसावळ आयुध निर्मानित ठेवण्यात आलेला टी-५५ टँक (रणगाडा)

भुसावळ (Bhusawal) (प्रतिनिधी) -

येथील आयुध निर्माणीच्या (Ordanance Factory) इस्टेट परिसरात (Estate Area) टी-५५ टँक (T-55 Tank) (रणगाडा) १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात (Indian Pakistan War) -सामील असलेला रणगाड्याचे अनावरण २० मे २०२२ रोजी निर्माणीचे महाव्यवस्थापक वसंत निमजे (OFB GM Vasant Nimje) यांच्या हस्ते करण्यात आले.

हा एक ऐतिहासिक टँक आहे. जो १९६० मध्ये भारतीय सैन्याचा (Indian Army) भाग बनला होता. जगातील सर्व देशांमध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा हा टँक आहे. त्याच्या वर १०० एम. एम. ची मुख्य तोफ असते, दोन ७. ६ एम.एम. च्या मशीन गन आणि एक १२.७ एम. एम. ची विमानभेदी तोफ बसवलेली असते, १९७१ च्या भारत-पाक युद्धात टी-५५ टँक ने मोठी भूमिका बजावली होती.

युद्धाच्या शेवटी, भारतीय सैन्याने दावा केला की या टँकने पाकिस्थानी २२६ टँक नष्ट केले आहे. या टँकमध्ये कमांडर, गनर, लोडर आणि ड्रायव्हर अशा ४ सैनिकांची टीम टँक ला चालवते. हा जगातील एकमेव टँक होता की त्या काळात युद्धात शत्रूचा पराभव करण्यास सक्षम मानला जात होता. या टैंक चे वजन ३६००० किलो आहे. ताशी ५० किमी वेगाने चालतांना १४ कि.मी दुर अंतरापर्यंतच्या लक्ष्यांवर अचुक मारा करू शकते.
येथील आयुध निर्मानिच्या (Ordnance manufacturing) इस्टेट एरियामध्ये ठेवण्यात आलेला हा टँक़ सर्व भुसावळवासीयांना पाहण्यासाठी खुला करण्यात आला आहे.
या प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती (ओएसडी) ए. एस. भटनागर (S.S, Bhatnagar), सुकांता सरकार (Sukanta Sarkar), दीपशिखा महिला कल्याण समितीच्या उपाध्यक्षा सुदिप्ता सरकार (Sudipta Sarkar), सचिव पूनम प्रजापती (Poonam Prajapati) व त्यांच्या सर्व पदाधिकारी महिला, सर्व युनियन असोसिएशनचे पदाधिकारी, जेसीएम थ्री, जेसीएम फोर्थ सदस्य, कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.
या टँकचे मेंटेनन्स, कलरिंग व सजावट लायटींग आणी फाउंडेशनच्या उभारणीत सहकार्य करणारे विभागांचे अधिकारी, कर्मचारी सुद्धा उपस्थित होते.

त्यावेळी महाव्यवस्थापकांनी त्या सर्वांचे र्कौतुक केले. अशी माहिती ऑर्डनन्स फॅक्टरीने जनसंपर्क अधिकारी बी. देवीचंद (PRO B. Devichand) (डिजीएम) यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com