Video राजकरण्यांनी एकत्र येवून आरक्षणाचा प्रश्‍न सोडवा-युवराज संभाजीराजे छत्रपती

चाळीसगावात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे दिमाखात अनावरण

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

शिवाजी महाराजांच्या (Shivaji Maharaj) विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख (Delhi) दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. परंतू सद्या महाराजांच्या राज्यात मराठा, (obc) ओबीसी व इतर आरक्षणासाठी आपण आपआपसात भांडत आहोत, या प्रश्‍नांमुळे दिल्लीत खासदारांंनामध्ये एक वेगळीच चर्चा सुरु असून सद्या महाराष्ट्रात काय चालू आहे ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. राजकारण-राजकारणाच्या ठिकाणी पण सद्या गरज आहे. ती महाराष्ट्र ओळख जपण्याची, त्यासाठी राज्यातील सर्व नेत्यांनी एकत्र येवून आरक्षणाचा मुद्दा सोडविला पाहिजे असे आवाहन शिवाजी महाराजांचे वंशज खासदर युवराज संभाजीराजे छत्रपती (MP Yuvraj Sambhaji Raje Chhatrapati) यांनी केले.

चाळीसगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचा अनावरण सोहळाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री गिरीष महाजन, खासदार रक्षाताई खडसे, उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, राजूमामा भोळे, संजय सावककारे, चंदूभाई पटेल, जि.प.अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्षज लालचंदभाई पाटील, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्या चाळीसगाव न.पा.चे नगरसेवक व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी राजांचे पुतळे व स्मारक बांधून चालणार नाही, तर त्यांचे विचार लिखीत स्वरुपात सर्वांपर्यंत पोहचले पाहिजे, गड्ड किल्ल्यांच्या सर्वधनासाठी मोठ्या प्रमाणात निधी उभा करण्याची गरज आहे. तरच भविष्यात या जिवंत किल्ल्यांचे जतन होईल.

राज्य चालवण्याचा परिपाठ शिवाजी महाराजांचा- देवेंद्र फडणवीस

शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांनी पाणी व्यवस्था, वनसंवर्धन याच बरोबर राज्य कसे चालवावे यांचा परिपाठ घालून दिला आहे. त्यांच्याच विचारांवर आम्ही चालत आहोत. त्यांचे विचार अंगीकृत करुन एक बलशाली राष्ट्र उभारणीसाठी सर्वांनी प्रयत्न करणेे जरुरीचे आहे.

याप्रसंगी माजी मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्यासह इतरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शिवपुतळ्याचे दिमाखात अनावरण

शिवाजी सोहळ्याच कार्यक्रमानतंर मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे मोठ्या दिमाखात अनावरण करण्यात आले. यानतंर तरुणाई डिजेच्या तालावर एकच ठेका धरला होता. शिवसोहळ्यासाठी मोठ्या संख्येेने तरुण वर्ग, महिला व पुरुष उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com