मारवड महाविद्यालयात " करीअर कट्टा

मारवड महाविद्यालयात " करीअर कट्टा

कळमसरे, Kalamasare, अमळनेर
मारवड (Marwad) येथील कै. न्हानाभाऊ म. तु पाटील कला महाविद्यालयात (Ca. Nhanabhau M. Tu Patil Arts College) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग (Maharashtra State Department of Higher and Technical Education) व महाराष्ट्र माहिती आणि तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र (Maharashtra Information and Technology Assistance Center) आणि क.ब.चौ. उ. म. विद्यापीठ, जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "करिअर कट्टा" (Career Board") या उपक्रमाच्या फलकाचे अनावरण, (Unveiling) करियर कट्टा जिल्हा समन्वयक प्रा. डॉ. विजय तुंटे (प्रताप महाविद्यालय (स्वायत्त) अमळनेर) , (Career Katta District Coordinator Pvt. Dr. Vijay Tunte) प्रा. डॉ. पवन पाटील (जिल्हा समन्वयक, विद्यार्थी विकास विभाग उमवि जळगाव) (Dr. Pawan Patil (District Coordinator, Student Development Department, UMVI)) यांच्या प्रमुख उपस्थितीत व महाविद्यालयातील प्रा. व्ही. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले.

यावेळी महाविद्यालयातील करियर कट्टा समन्वयक प्रा. डॉ. माधव वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले, तर सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन महाविद्यालयीन करियर कट्टा विद्यार्थी प्रतिनिधी सागर कोळी याने केले.सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी करिअर कट्टा या उपक्रमाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पदी सागर कोळी आणि वर्षा पाटील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत देसले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com