विलीनीकरण होत नाही तोपर्यंत....

आंदोलक 52 शहीद कर्मचार्‍यांच्या दुखवट्यात; एसटी कर्मचारी संपावर ठाम
विलीनीकरण होत नाही तोपर्यंत....

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

एस.टी. कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेने (S.T. Junior pay grade organization) संपातून माघार (Withdraw) घेतली असली तरी जळगावातील संपकरी कर्मचार्‍यांनी (employees) आपला संप (strike) कायम ठेवला आहे. आमचा लढा विलीनीकरणासाठी (Merger) असून यावर निकाल होईपर्यंत आम्ही संप करणार असल्याचे त्यांनी ठाम निर्णय (Firm decision) असल्याचे संपकरी कर्मचार्‍यांनी सांगितले.

आंदोलकांनी कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेचे अजय गुजर यांनी माघार घेतली आहे. आजपर्यंत 28 संघटनांनी या लढ्यातून माघार घेतली आहे. यातून कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना माघार घेणारी 29 वी संघटना ठरली आहे. मात्र, एस.टी. महामंडळाचे शासनात विलणीकरण होत नाही तोपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार कर्मचार्‍यांनी व्यक्त केला आहे. अनिल गुजर यांना 3 तारखेला देण्यात आलेल्या नोटीसीप्रमाणे हा संप त्याच्या कनिष्ठ वेतनश्रेणी संघटनेने मागे घेतला आहे. आंदोलक 52 शहीद कर्मचार्‍यांच्या दुखवट्यांत असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत अविरत लढा देऊ असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला.

अजय गुरज यांनी कर्मचार्‍यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केले आहे. याबाबत आम्ही अमिषाला बळी पडणार्‍या अजय गुजर यांच्या पाठीशी नाही. विलणीकरण च्या लढ्यात ज्या बांधवांनी आहुती दिली त्यांच्या दुखवट्यांत आहोत. अजय गुजर यांनी माघार घेतली याबाबत त्याचे आभार व्यक्त करत अशांमुळे एकवटलेले कर्मचारी विभक्त झाले असते अशी भावना व्यक्त केली. तसेच एसटीचे राज्य शासनात विलीगीकरण होत नाही तो पर्यंत आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे कर्मचार्‍यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com