Photos # बेशिस्त रिक्षाचालक ठरताय वाहतुकीस अडथळा

Photos # बेशिस्त रिक्षाचालक ठरताय वाहतुकीस अडथळा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

मेट्रो सीटीप्रमाणेच वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे (increasing number of vehicles) जळगावात देखील वाहतुक कोंडीची समस्या ( Traffic congestion problem ) भेडसावू लागत आहे. शहरातील मुख्यरस्त्यावरुन जातांना सकाळपासूनच रात्रीपर्यंत वाहतुकी कोंडीला (Traffic congestion problem) समोरे जावून त्यातून मार्गक्रमण करावे करावे लागते त्यात नवीन नाही. त्यातच भर म्हणजे शहरातील बेशिस्त रिक्षाचालक (Rude rickshaw puller) थेट रस्त्याच्या मधोमध (middle of the road) रिक्षा (Rickshaw) उभी करीत असल्याने त्यामुळे वाहतुकीचा अडथळा (Traffic obstruction) निर्माण करीत असल्याचे चित्र शहरातील सर्वचठिकाणी दिसून येत आहे.

Photos # बेशिस्त रिक्षाचालक ठरताय वाहतुकीस अडथळा
गुन्हेगारांच्या हद्दपारीचे 100 प्रस्ताव प्रांतांकडे प्रलंबितच

पुणे, मुंबई, नाशिक या मेट्रोसीटींप्रमाणेच जळगावचा विस्तार मोठ्या झपाट्याने होत आहे. त्यातच वाढत्या लोकसंख्येबरोवर वाहनांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहन संख्येच्या तुलनेने शहरातील रस्ते छोटे ठरू लागले आहे. त्यामुळे जळगाकवरांना मेट्रोसीटींमध्ये भेडसावणारी वाहतुक कोंडीची समस्या आता जळगावात देखील भेडसावू लागली आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या टॉवर चौकातसह सर्वच मुख्य रस्त्यांगत असलेल्या अपार्टमेंट किंवा व्यापारी संकुलांमध्ये पार्कींगची व्यवस्था करण्यात आलेली नाही. ज्याठिकाणी पार्कींगची व्यवस्था आहे त्याठिकाणी काही जणांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांना नाईलाजास्तवर आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करावी लागतात. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होवून त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Photos # बेशिस्त रिक्षाचालक ठरताय वाहतुकीस अडथळा
दूध संघाच्या निवडणुकीत माघारीसाठी मनधरणी

रस्त्याच्या मधोमध उभ्या करतात रिक्षा

आधीच बेशिस्त पार्कींगमुळे रत्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यात अजून बेशिस्त रिक्षाचालक थेट रस्त्याच्या मधोमध प्रवाशांसाठी वाहने उभी करीत असल्याचे जळगावकरांसाठी नवीन नाही. त्यामुळे वाहतुक कोंडीसह छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Photos # बेशिस्त रिक्षाचालक ठरताय वाहतुकीस अडथळा
Photos# राज्य नाट्य स्पर्धा 2022 : मडवॉक : बुध्द तत्वज्ञानावरील सर्वांगसुंदर नाट्यानुभव!

वाहतूक पोलिसांचा कानाडोळा

बेशिस्त वाहतुक करणार्‍यांवर कारवाईसाठी पोलीस दलाकडून शहर वाहतुक शाखा तयार करण्यात आली आहे. मात्र सुभाषचौक, टॉवरचौक, गोलाणी मार्केट, फुले मार्केट, काँग्रेस भवन, चित्रा चौक यासह गर्दीच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी ही नित्याचेच आहे. याठिकाणी वाहतुक पोलिस नियुक्त देखील असतात. परंतु त्यांच्याकडून बेशिस्त रिक्षाचालकांसह वाहनचालकांवर कारवाई न करता त्यांच्याकडे कानाडोळा करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.

पुन्हा जैसे थे परिस्थिती

उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून गेल्या काही दिवसांपुर्वी शहरात कारवाईची मोहीम राबविण्यात आली होती. या कारवाईत त्यांकडून शहराती बेशिस्त वाहनांसह विनापरवाना असलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई केली होती. अचानक झालेल्या या कारवाईमुळे बेशिस्त वाहनचालकांवर वकच निर्माण झाला होता. मात्र या कारवाईनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

सुभाष चौकातील परिस्थती अत्यंत गंभीर

शहरातील मुख्य सोने चांदीची बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या सुभाष चौकात सकाळपासून मोठ्या प्रमाणात गर्दी असते. दरम्यान, याठिकाणी देखील बेशिस्त रिक्षाचालक थेट व्यापार्‍यांच्या दुकानासमोर किंवा रस्त्याच्या मधोमध रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे याठिकाणी वाहतुक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर बाब बनली आहे. दरम्यान, रिक्षाचालकांना हटकले असता त्यांच्याकडून अरेरावीची देखील भाषा वापरली जात असल्याने ही कायमची डोकेदुखी असल्याची प्रतिक्रया व्यापार्‍यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com