अमळनेरच्या धनदाई कॉलेजच्या वार्षिक नियतकालिकास विद्यापीठाचे तिसरे पारितोषिक

अमळनेरच्या धनदाई कॉलेजच्या वार्षिक नियतकालिकास विद्यापीठाचे तिसरे पारितोषिक

अमळनेर Amalner प्रतिनिधी

येथील धनदाई महाविद्यालयाच्या (Dhandai College) "धनदाई" या वार्षिक नियतकालिकास (annual journal) कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे (Poet Bahinabai Chaudhary from North Maharashtra University) उत्कृष्ट मुखपृष्ठाबद्दल तृतीय क्रमांकाचे पारितोषिक (Third place prize) जाहीर झाले आहे.

यानिमित्ताने मुखपृष्ठाची संकल्पना (concept of the cover) मांडणाऱ्या प्रज्ञानंद सावंत या बी ए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा सत्कार (Students felicitated) करण्यात आला. याप्रसंगी धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी पाटील, प्राचार्य डॉ. प्रमोद पवार, नियतकालिकाचे संपादक डॉ. भगवान भालेरा, आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. लीलाधर पाटील, प्रा. प्रशांत पाटील, डॉ. शैलेश पाटील आदी उपस्थीत होते.

गेली दोन वर्ष करोना महामारीने जग व्यापलेले अमळनेर, अमळनेर शहरात यादरम्यान कार्य करणाऱ्या डॉक्टर, पोलीस, पत्रकार व इतर समाजसेवी संघटना यांच्या कार्याचा गौरव, तसेच कोरोनामुळे जगात झालेले बदल (Corona changes the world) हे धनदाई अंकाने आपल्या मुखपृष्ठ प्रतिबिंबित केले होते. याबद्दल नुकताच विद्यापीठाने हा पुरस्कार (prize) जाहीर केला असून हा पुरस्कार महाविद्यालय व मुखपृष्ठाची संकल्पना मांडणाऱ्या विद्यार्थी यांना विभागून देण्यात येणार आहे.

अंमळनेर येथील एस.. के ऑफसेटचे मनीष बडगुजर यांनी मुद्रित केलेल्या या नियतकालिकेचे संपादन डॉ भगवान भालेराव यांनी केले असून संपादक मंडळात प्रा. प्रशांत पाटील, प्रा मीनाक्षी इंगोले प्रा. लीलाधर पाटील हे होते. या यशाबद्दल चेअरमन के. डी. पाटील, संचालक शैलेंद्र पाटील यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेटर कर्मचारी यांनी संपादक मंडळ व प्रज्ञानंद सावंत यांचे अभिनंदन केले आहे.

Related Stories

No stories found.